Pune Phugewadi Poisonous Liquor Case Sarika Rathod Story : ‘आम्हाला दान नको, काम हवे. मुलांना शिकवून त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. महापालिकेकडून तात्पुरती रोजगाराची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, किमान घर चालविता येईल, मुलांचे शिक्षण आणइ आरोग्याकडे लक्ष देता येईल, असे काम मिळायला हवे. माझा नवरा, दीर आता परत येणार नाही, दारुच्या मार्गावर कोणीही जाऊ नये’, असं मृत विजय राठोड यांची पत्नी सारिका राठोड यांनी म्हटलं आहे.
राठोड कुटुंबाने कष्टाने संसार उभा केला
रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या राठोड कुटुंबाने कष्टाने संसार उभा केला होता. मात्र, विषारी दारूमुळे राजू आणि विजय या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आणि सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले. या आघातानंतर कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. सारिका राठोड सकाळपासून घराघरांत धुणीभांडी करतात. मोठा मुलगा राजूच्या निधनानंतर त्यांची पत्नी संगीता मुलांना घेऊन माहेरी गेल्या. त्यांचे सासरेही विषारी दारु प्यायल्यामुळे अंथरुणाला खिळले आहेत, तर सासू मानसिक धक्क्यातून सावलेल्या नाहीत. सारिका राठोड मिळेल ते काम करतात. ११ वर्षांचा श्रेयस आणि सात वर्षांची चैत्राली यांच्या भवितव्याची चिंता त्यांना सतावत आहे. मुलांचे शिक्षण थांबू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
Eknath Shinde : दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? Health Update समोर
तुटपुंज्या उत्पन्नातून घरभाडे, किराणा, औषधे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचा प्रयत्न करतात. अकरा वर्षांचा श्रेयस आणि सात वर्षांची चैत्राली यांच्या भवितव्याची चिंता त्यांना सतावत आहे. मुलांचे शिक्षण थांबू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. विषारी दारू दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, अनेक कुटुंबांना ती अद्याप मिळालेली नाही. तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला कायम नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशा मागण्या पीडित कुटुंबांनी केल्या आहेत.
सरकारी मदतीची प्रतीक्षा कायम
विषारी दारू दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, अनेक कुटुंबांना ही मदत अद्याप प्रत्यक्ष मिळालेली नाही. कागदपत्रांची पूर्तता, बँकेच्या फेऱ्या आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदत रखडल्याची तक्रार कुटुंबीयांकडून केली जात आहे. दरम्यान, पीडित कुटुंबांनी तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरुपी रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी केली आहे.
Pune Crime : कंपनीत शिफ्ट सुरु असताना संतापजनक कृत्य, सहकाऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातल्याने पोटात हवा; पुण्यात कामगाराचा मृत्यू
एकाच खोलीत संसार…
सारिका या दोन मुले आणि सासू, सासऱ्यांसह एका खोलीत राहतात. सासरे अंथरुणाला खिळल्याने खाटेवर पडून असतात. तिथेच स्वयंपाक करायचा, तिथेच सर्वांनी झोपायचे. शौचालयाचीही सुविधा नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ही केवळ राठोड कुटुंबीयांची परिस्थिती नाही, तर परिसरातील सर्वच पीडितांची कथा आहे.
Pune News: प्रेमविवाह करून बारामतीतून पुण्यात शिफ्ट झाले, पण पती ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडला; तरुणीने जीवन संपवलं!
‘फुगेवाडीतील एकूण १७ पीडित कुटुंबीयांपैकी आठ कुटुंबीयांना सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. उर्वरित कुटुबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया चालू आहे’, असं अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी म्हटलं आहे.
