RTI Act Maharashtra : राज्य माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना अखेर स्थगिती देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर राज्य मुख्य माहिती आयोगाने १२ जूनच्या राजपत्रातील संबंधित बदलांना स्थगिती दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्य माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या वादग्रस्त बदलांवर अखेर राज्य सरकारने ब्रेक लावला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यानंतर राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी १२ जूनच्या राजपत्रातील संबंधित बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. माहिती अधिकार कायद्यातील बदलांवरून राज्यभर चर्चा सुरू असतानाच अण्णा हजारे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. मात्र, चर्चा होऊनही हजारे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहिले.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी राज्य माहिती आयोगाला पत्र पाठवून अण्णा हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
वादग्रस्त बदलांना स्थगिती
मुख्यमंत्र्यांच्या पत्राची दखल घेत राज्य मुख्य माहिती आयोगाने १२ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व वादग्रस्त बदलांना स्थगिती दिली. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या दुरुस्त्यांबाबतचा वाद सध्या तरी थांबला असून अण्णा हजारे यांनी मांडलेल्या आक्षेपांची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अण्णा हजारेंचा उपोषणाचा इशारा
या निर्णयापूर्वी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रस्तावित दुरुस्त्या तातडीने मागे घेण्याची मागणी केली होती. अन्यथा ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
Mumbai News : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; BMCच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन, कंत्राटदार ब्लॅकलिस्ट
पत्रात त्यांनी माहिती अधिकार कायदा हा सामान्य नागरिकांच्या हातातील भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र असल्याचे नमूद केले होते. या कायद्याची ताकद कमी करणारे कोणतेही बदल लोकशाहीसाठी धोकादायक ठरतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
काय व्यक्त केली होती भीती?
प्रस्तावित बदलांमुळे माहिती आयोगाचे अधिकार कमी होण्याची शक्यता असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले होते. त्यामुळे नागरिकांना माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात, तसेच शासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावरही परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
गेल्या दोन दशकांत माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली असून सामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी हे प्रभावी साधन ठरले आहे. त्यामुळे कायद्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून जनहिताला बाधा आणणाऱ्या तरतुदी मागे घ्याव्यात, अशी मागणीही अण्णा हजारे यांनी केली होती.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा