Western Railway: गरिब नगर येथील अतिक्रमण हटवल्यानंतर उपलब्ध झालेल्या जागेत वांद्रे स्थानकाचा विस्तार करण्यात येत आहे. आता प्रवाशांसाठी एक स्वतंत्र डेक उभारण्यात येणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाचा सध्या विस्तार होत आहे. मे महिन्यात गरीब नगर येथील अतिक्रमण हटवून रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे जागा मोकळी करण्यात आली होती. आता या जागेवर वांद्रे स्थानकाच्या पश्चिमे प्रमाणेच पूर्वेकडेही पायाभूत सुविधांचा विकास केला. या प्रकल्पात वांद्रे पूर्वेकडे प्रवाशांसाठी एक एलिव्हेटेड डेक उभारण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कसा असेल डेक?
वांद्रे स्थानकाच्या पूर्व दिशेला एक ३०० चौरस मीटर डेक बांधला जाणार आहे. या डेकवर एकावेळी ७०० प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या पादचारी पुलांचा विस्तार करून या डेकशी जोडण्यात येणार आहे. या डेकवर उपनगरिय रेल्वे ट्रेनचे इंडिकेटेर लावले असतील. तसचं, प्रवाशांसाठी इतर पायाभूत सुविधाही उपलब्ध केल्या असतील. पादचारी पुलांवरील गर्दी कमी करण्याच्या हेतूने हा डेक बांधला जात आहे. तसेच, प्रवाशांना थांबण्यासाठी व विश्रांती करण्यासाठी एक जागा मिळणार आहे.
Mumbai-Vadodara Expressway: मुंबईतून नवा १५७ किमी लांब द्रुतगती महामार्ग, ऑगस्टमध्ये प्रवासासाठी खुला होणार; कुठून-कुठे जोडणार?
वांद्रे कुर्ला संकूल, वांद्रे कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा कार्यालायच्या जवळ असल्यामुळे वांद्रे स्थानकाच्या पूर्व दिशेला मोठा संख्येने कर्मचारी दाखल होतात. तसेच, रिक्षा आणि बेस्टचे प्रवासीही इथेच दाखल होतात. या सर्व प्रवाशांची वर्दळ हाताळण्यासाठी डेकची गरज आहे. यामुळे वांद्रे स्थानकाचं रुपांतर एका ‘मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब’मध्ये होईल.
अतिक्रमणमुक्त जागेचं काय करणार?
गरिब नगर येथील अतिक्रमण हटवून मिळालेल्या जमिनीवर सर्व प्रथम वांद्रे टर्मिनस येथील डिझल शेडचं स्थलांतर करण्यात येईल. या शेडचं स्थालांतर होताच, ती मोकळी जागा वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी वापरली जाणार आहे. सात फलटांसह आणखी मार्गिका बांधण्यात येतील. पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्यांच्या संख्या वाढवण्याच्या हेतूने हा विस्तार सुरू आहे. वांद्रे टर्मिनसवर १० नव्या मार्गिका सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. यानुसार टर्मिनसवर दहा नव्या ट्रेन धावू शकतील.
Mumbai-Bengaluru Vande Bharat Sleeper: देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर सज्ज, मुंबई-बंगळुरू प्रवास वेगवान होणार; किती डबे? मार्ग कोणता?
यासह मुंबई सेंट्रल येथील पाच फलाटांचाही येत्या काही वर्षांमध्ये विस्तार होणार आहे. सध्या या स्थानाकवर २२ डब्यांच्या ट्रेन हाताळण्याची क्षमता आहे. पण विस्तारानंतर २४ डब्यांच्या ट्रेनची वाहतूकही हाताळणं सोपं होणार आहे. शिवाय रेल्वे मार्गांचं अपग्रेड सुरू आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या ट्रेनचा वेग वाढणार आहे. सध्या ज्या ट्रेन ताशी १०० ते ११० किमी वेगाने धावतात त्या ट्रेन १३० किमी वेगाने धावतील.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा