Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांच्या तरुण वयाचा आणि राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांना पक्ष बदलण्यासाठी प्रोत्साहित केल्याची माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सचिन अहिर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेसेनेची साथ सोडत शिवसेनेचा भगवा हाती धरण्यासाठी आणि विधान परिषदेचे उपसभापतीपद स्वीकारण्यास राजी करण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समजते.
फडणवीसांची मध्यस्थी
फडणवीस यांनी सचिन अहिर यांच्या तरुण वयाचा आणि राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांना पक्ष बदलण्यासाठी प्रोत्साहित केल्याची माहिती आहे. तसेच अहिर हे मृदूभाषी आणि अनुभवी असल्याने, पक्षातील इतर कोणत्याही आमदाराची निवड करण्याऐवजी त्यांनाच विधान परिषदेचे उपसभापतीपद दिले जावे, यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचेही मन वळवले. फडणवीस यांच्या या प्रयत्नांमुळेच सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली, असे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.
उपसभापतीपदी बिनविरोध निवड
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या सचिन अहिर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देताना महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरेसेनेकडून विधान परिषदेवरील शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या ज. मो. अभ्यंकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. Ajinkya Naik : ना देवरा ना अहिर; 2029 मध्ये वरळीतील लोकप्रिय चेहरा दक्षिण मुंबईतून NDA चा लोकसभा उमेदवार? सोशल मीडियावर चर्चांना पेव
उद्योजक वर्मांवर ऑफरेशन टायगरची जबाबदारी?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सहा लोकसभा खासदारांना पक्षात ओढण्याच्या ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी उत्तर भारतातील शस्त्र-व्यापारी आणि उद्योजक अभिषेक वर्मा यांच्यावर सोपवण्यात आली होती. या मोहिमेचे काम अत्यंत आव्हानात्मक असल्याने ती यशस्वी करण्यासाठी संबंधित व्यक्तींनी आंध्र प्रदेशातील उद्योजक आणि वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार अल्ला अयोध्या रामी रेड्डी यांनाही यात सामील करून घेतले, असेही वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिले.
अभिषेक वर्मा यांना राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तर अल्ला अयोध्या रामी रेड्डी यांना आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) एक फायदेशीर कंत्राट मिळवून देण्याचे निश्चित करण्यात आले होते, असेही वृत्त आहे.
सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट; उपसभापती पदाबाबत नीलम गोऱ्हे थेट बोलल्या
विरोधी पक्षनेतेपद रिक्तच
‘महायुती’ सरकारच्या कार्यकाळातील हे विधानसभेचे सहावे अधिवेशन आहे, ज्यामध्ये विरोधी पक्षनेत्याचे पद अद्याप रिक्त आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधी पक्षाचे स्थानही अत्यंत महत्त्वाचे असते, परंतु महाराष्ट्रात विरोधी पक्षाला हे पद मिळालेले नाही. Vihan Shrivastav : आमचं बाळ आता परत येणार नाही… विहानच्या पार्थिवाशेजारी क्रिकेटचा बॉल ठेवला, जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, पाऊसही धाय मोकलून रडला २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे, तर विरोधी पक्षाकडे केवळ ५० आमदारांचे बळ आहे. विरोधी पक्षाच्या या ५० आमदारांपैकी फारच कमी आमदार सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत आहेत आणि जे उपस्थित राहत आहेत, तेही प्रभावीपणे आवाज उठवताना दिसत नाहीत. परिणामी, विरोधी पक्षनेता आणि विरोधी पक्षाचा आवाज या दोन्ही गोष्टींशिवायच हे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा