• Thu. Jul 2nd, 2026

    Pune Weather: पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार; दोन दिवसांसाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

    Pune Weather: पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार; दोन दिवसांसाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पुढील काही दिवस पुणे आणि परिसरात पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा, दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही ‘आयएमडी’ने दिला आहे.

    पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या पावसाळी हंगामाचा चिंब करणारा पहिला अनुभव पुणेकरांनी बुधवारी घेतला. पुणे शहरासह जिल्ह्यात दिवसभर कमी-अधिक पावसाने हजेरी लावली आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळला. रात्री साडेआठपर्यंत शहरात ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रात्री उशिराही पावसाची भुरभुर सुरू होती.

    सकाळपासूनच शहरावर ढग दाटून आले होते. दिवसभर वाऱ्याची झुळूक वाहत राहिल्याने उष्णतेचा त्रास कमी झाला. दुपारी बाराच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास जोरदार सरी पडल्या. त्यानंतर अधूनमधून हलका पाऊस सुरू राहिल्याने शहरातील वातावरण पूर्णपणे बदलले. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कमाल तापमानात घट होऊन दिवसभरात कमाल २७.४ आणि किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

    दिवसभर पावसाने वाहतूक खोळंबली

    शहरातील बहुतांश भागांत वाहने रस्त्यावर थांबून होती. काही मार्गांवर नेहमीपेक्षा १० ते १६ मिनिटांचा अतिरिक्त विलंब होत असल्याचेही नोंदवले गेले. मुंढवा, मगरपट्टा, वाघोली, लोणी काळभोर, बंड गार्डन, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज, कोंढवा, बिबवेवाडी, येरवडा, विश्रांतवाडी आदी भागांत वाहतुकीचा फटका बसला. विशेषतः मुंढवा ते मगरपट्टा मार्ग, बंडगार्डन चौक, शिवाजीनगर परिसर, कात्रज चौक; तसेच कोंढवा-इस्कॉन मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.
    शहरात बुधवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे शहरात मध्यवस्तीपासून उपनगरापर्यंत सर्वत्र वाहतूक कोंडी झाली. विशेषत: सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने प्रमुख रस्ते, चौक आणि उड्डाणपुलांवर वाहनांच्या रांगा लागल्या. पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही मार्गांवर वाहनचालकांना तासाभराहून अधिक काळ कोंडीत अडकावे लागले.

    शहरात दुपारनंतरच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग कमी झाला. काही चौकांत सिग्नल ओलांडण्यासाठीही वाहनचालकांना अनेक फेऱ्या थांबावे लागले. कार्यालयातून घरी निघालेल्या कर्मचारीवर्गाला वाहतूक कोंडीचा फटका बसला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला.

    वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केला. मात्र, प्रमुख मार्गांवरील ताण वाढल्याने अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची गर्दी झाली. दुचाकीस्वार आणि कारचालक पाऊस आणि संथ वाहतुकीने हैराण झाले. वाहतूक पोलिसांनी प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पाऊस थांबल्यावर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली. मात्र, सायंकाळपर्यंत अनेक भागांत वाहनांची संथ गती कायम होती.

    शहरात बुधवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे टिळक रस्त्यावरील पूरम (अभिनव) चौकात, अक्षरधारा बुक गॅलरीजवळ मोठे झाड कोसळले. यामुळे ठप्प झालेली वाहतूक, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवून सुरळीत केली. आपटे रस्त्यावरही झाडाची मोठी फांदी पडली. दोन्ही घटनांत पादचारी आणि वाहनचालक थोडक्यात बचावले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed