• Wed. Jul 1st, 2026

    दूधगंगा प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याची कामे त्वरित करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 1, 2026
    दूधगंगा प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याची कामे त्वरित करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १:-  दूधगंगा प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याची कामे त्वरित करावीत असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

    जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रभारी मुख्य अभियंता अलका अहिरराव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    दूधगंगा डावा कालवा अस्तरीकरणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. जयसिंगराव तलाव प्रश्नी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करून कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले.

    कागल नगर परिषदेने पाझर तलाव येथे पर्यटन विषयक चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. या ठिकाणी आवश्यक कामे करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडून नाहरकत घ्यावी असे निर्देश देण्यात आले.

    ०००००

    एकनाथ पोवार/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed