- डॉ. संजय ज्ञानदेव पाटील व यज्ञेश वसंत सावे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे मानकरी

मुंबई, दि.१ : दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे कृषी विभागातर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै या कृषि दिनानिमित्त आयोजित कृषि पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे यासह राज्यातील कृषि पुरस्कार विजेते उपस्थित होते.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२३ कोल्हापुर विभाग मधून मु.पो.तळसंदे, ता.हातकणंगले, येथील डॉ.संजय ज्ञानदेव पाटील यांना तर २०२४ चा ठाणे विभागातून जि.पालघर, ता. तलासरी, मु.पो.ब्राम्हणगाव (झाई बोरीगाव) येथील यज्ञेश वसंत सावे यांना तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले. कृषि विभागात प्रातिनिधीक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

कृषी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
राज्यपाल वर्मा म्हणाले की, भारताची संस्कृती, परंपरा आणि समृद्धीचा पाया शेतकरी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शेतकऱ्यांचे कल्याण ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळत असून पशुपालक आणि मत्स्यव्यवसायिकांनाही कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे.’बीज ते बाजार’ ही संकल्पना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरत आहे.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, ड्रोन तंत्रज्ञान, मृदा आरोग्य पत्रिका आणि नैसर्गिक खतांचा वापर यासारख्या उपक्रमांमुळे कृषी उत्पादकतेत वाढ होत आहे. राज्य शासनाने शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित, हवामान अनुकूल आणि बाजारपेठाभिमुख करण्यासाठी अनेक परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले आहेत. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत शेततळी, शेततळ्यांचे अस्तरीकरण आणि विविध जलसाठा संरचनांची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली आहे. हजारो शेततळी पूर्ण झाली असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक सहाय्य जमा करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरू शकतो. नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि समृद्धीही वाढेल. यासोबतच देशी गोवंशाचे संवर्धन आणि संरक्षण यावरही विशेष भर देण्याची गरज आहे. गोआधारित जैविक घटक नैसर्गिक शेतीचा महत्त्वाचा आधार असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.

पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी जलसंधारण, सौर कृषी पंप, दिवसा मोफत वीज, कृषी यांत्रिकीकरण, प्रमाणित बियाणे, सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार अशा विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्याने काम करत असून, “महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही. राज्यात जलयुक्त शिवार अभियान आणि शेततळे योजनेच्या माध्यमातून २२ हजारांहून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची व्यापक कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे अनेक भागांमध्ये एक पिकावरून दोन आणि तीन पिकांची शेती शक्य झाली असून, ज्या भागात शेती करणे कठीण होते, त्या ठिकाणीही फळबागा फुलू लागल्या आहेत. हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी जलसंधारण हा प्रभावी उपाय ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय प्रभावीपणे राबविण्यात येत असून, सौर कृषी पंपांच्या स्थापनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. प्रधानमंत्री योजनेअंतर्गत देशभरात बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपांपैकी ६० टक्के पंप महाराष्ट्रात बसविण्यात आले आहेत. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून, चालू वर्षाअखेर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविण्यासाठी राज्य शासन दरवर्षी २८ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी दरवर्षी १,५०० ते २,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असून, विविध कृषी अवजारांवर ८० ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता राज्यात प्रमाणित बियाणेच विक्रीस उपलब्ध राहतील. सर्व बियाण्यांचे ऑनलाईन प्रमाणन बंधनकारक करण्यात आले असून, प्रमाणित नसलेले बियाणे विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे नकली बियाण्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील दुष्काळी भागांना दीर्घकालीन दिलासा मिळावा यासाठी फ्लड डायव्हर्जनच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांपर्यंत आणि पुढे उजनीमार्गे मराठवाड्यात पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे भविष्यात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरस्कार विजेते शेतकरी हे कृषी विभागाचे ‘अॅम्बेसेडर’ असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्या प्रयोगशील शेतीतून आणि नवकल्पनांतून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. आधुनिक शेतीचे तंत्र, नवीन वाण आणि यशस्वी प्रयोग गावागावांत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी या पुरस्कार विजेत्यांवर आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णयही घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच शासनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषी पुरस्कारांनी सन्मानित शेतकऱ्यांचे अभिनंदन करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही प्रयोगशील आणि नावीन्यपूर्ण शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले पुरस्कार विजेते शेतकरी हेच कृषी विभागाचे खरे राजदूत आहेत.
शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला अधिक बळकटी देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि अन्य उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला जात आहे. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारे विधेयक चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. जिजामाता कृषी भूषण पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या योगदानाचा गौरव होत आहे. कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बारामती येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या माध्यमातून शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि जलसंधारणाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कृषी विभाग, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे आणि शेतकरी यांच्या समन्वयातून राज्यातील शेती अधिक आधुनिक, शाश्वत व स्पर्धात्मक होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषीरत्न पुरस्कार’ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कृषी क्षेत्रात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पुढील वर्षापासून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषी रत्न पुरस्कार’ सुरू करण्यात येणार आहे. आज शेतक-यांना मिळालेले हे पुरस्कार व सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून त्यांच्या कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राच्या कृषी परंपरेचा गौरव आहे. हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चार कृषी विद्यापीठांची स्थापना झाली आणि कृषी विकासाला नवी दिशा मिळाली, असे नमूद केले. दिवंगत मुख्यमंत्री नाईक यांनी पाहिलेले समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन दिलासा दिल्याचे सांगत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि पाठबळ दिल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करतांना त्यांच्या मार्गदर्शनाचा कृषी विभागाला मोठा लाभ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृषी मंत्री भरणे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी २ हजार कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. उर्वरित ३ हजार कोटी रुपयांची तरतूद हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल माफ करण्यात आले असून गेल्या दोन वर्षांत यासाठी सुमारे २९ ते ३० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ५५ हजार कोटी रुपयांहून अधिक लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
२०२३ व २०२४ साठी १८९ पुरस्कारार्थीं
डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्करासाठी राज्यातून एक पुरस्कारार्थी असून रूपये तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले. २०२३ व २०२४ मध्ये दोन विजेते आहेत. वसंतराव नाईक कृषिभूषण ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ६ व २०२४ साठी ८ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ८ व २०२४ मध्ये ८ पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ७, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ७, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, युवा शेतकरी मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ८, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, उद्यान पंडित ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख रूपये पारितोषिक रक्कम २०२३ मध्ये ८, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारामध्ये ४० (सर्वसाधारण प्रवर्ग साठी प्रति जिल्हा १ याप्रमाणे ३४ व आदिवासी प्रवर्ग साठी प्रति विभाग १ याप्रमाणे ०६ ) ४४ हजार रूपये पारितोषिक रक्कम, २०२३ मध्ये ३६, २०२४ मध्ये ३९ पुरस्कार, सेवारत्न पुरस्कारासाठी १० (प्रति विभाग १ याप्रमाणे ८, कृषी आयुक्तालय स्तर-१ व मंत्रालय स्तर -१) २०२३ मध्ये १० २०२४ मध्ये १० पुरस्कारांचे वितरणा करण्यात आले असे एकूण २०२३ साठी ९१ व २०२४ साठी ९८ एकूण १८९ पुरस्कारार्थींना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सन २०२३ व सन २०२४ साठी १८९ पुरस्कारार्थीं कृषी पुरस्काराने सन्मानित
राज्यात कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यांना व अधिका-यांना कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.वरळी डोम सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात यावेळी राज्यपाल व जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सन २०२३ कोल्हापुर विभाग मधून मु.पो.तळसंदे, ता.हातकणंगले, येथील डॉ.संजय ज्ञानदेव पाटील यांना तर सन २०२४ चा ठाणे विभागातून जि.पालघर, ता. तलासरी, मु.पो.ब्राम्हणगाव (झाई बोरीगाव) येथील श्री.यज्ञेश वसंत सावे यांना तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न राज्यातून एक पुरस्कारार्थी असून रूपये तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले.असे सन २०२३ व २०२४ मध्ये दोन विजेते आहेत. वसंतराव नाईक कृषिभूषण ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ६ व २०२४ मध्ये ८ पुरस्कार वितरण करण्यात आले. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ८ व सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ७ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ७ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, युवा शेतकरी मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ८ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, उद्यान पंडित८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ८ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारामध्ये ४० (सर्वसाधारण प्रवर्ग साठी प्रति जिल्हा १ याप्रमाणे ३४ व आदिवासी प्रवर्ग साठी प्रति विभाग १ याप्रमाणे ०६ ) चव्वचाळीस हजार रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ३६ सन २०२४ मध्ये ३९ पुरस्कार, सेवारत्न पुरस्कारासाठी १० (प्रति विभाग १ याप्रमाणे ०८, कृषी आयुक्तालय स्तर-०१ व मंत्रालय स्तर -०१) सन २०२३ मध्ये १० सन २०२४ मध्ये १० पुरस्कारांचे वितरणा करण्यात आले असे एकूण सन २०२३ साठी ९१ व सन २०२४ साठी ९८ एकूण १८९ पुरस्कारार्थींना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सन २०२३ चे विविध पुरस्कारार्थी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार -२०२३ विभाग कोल्हापुर डॉ.संजय ज्ञानदेव पाटील मु.पो.तळसंदे , ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार ठाणे श्री.शरद गणपत धुरी, मु.पो.झाराप, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. नाशिक विभागातील श्री. बाळासाहेब कडु देवरे मु.पो. वाजगाव ता. देवळा जि. नाशिक.पुणे विभागातील श्री. शिवानंद मल्लेशी शिंगडगाव मु.पो.मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर जि.सोलापूर कोल्हापुर विभागातील श्री.गणपत रामचंद्र पारटे मु. पो. भिलार, ता. महाबळेश्वर जि. सातारा, छ.संभाजीनगर विभागातील श्री.अभयकुमार बाजीराव काळुंके मु.पो – रायपुर ता.परतूर जि.- जालना. अमरावती विभागातील श्री. हेंमत वसंतराव देशमुख म.पो.डोंगरकिन्ही ता.मालेगांव जि.वाशिम.
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार-२०२३ ठाणे विभागातून सौ.दर्शना आनंद दामले मु.जांभीळघर,ता.अंबरनाथ, जि. ठाणे.,नाशिक विभागातून श्रीमती. भावना निळकंठ निकम मु.पो. दाभाडी ता. मालेगाव जि. नाशिक पुणे विभागातून श्रीमती श्रद्धा सत्यवान ढवन मु.मोरवाडी,ता.पारनेर,जि.अहिल्यानगर., कोल्हापूर विभागातून सौ.अरुंधती संजय पाटील मु.पो.धरणगुत्ती, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर छ.संभाजीनगर विभागातून श्रीमती मंगल बाळासाहेब काकडे मु. पो. बनसारळा, ता.केज जि. बीड , लातूर विभागातून श्रीमती प्रतिभा रामराव काळे मु.पो.फणेपूर, ता.लोहारा, जि.धाराशिव. अमरावती विभागातून सौ.ललीता विश्वास गोदमले मु.पो.रामगांव ता.मंगरुळपीर जि.वाशिम. नागपूर विभागातून सौ. प्रिती रिषी टेंभरे मु.पो.चुटीया ता. जि.गोंदिया
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार-२०२३ नाशिक विभागातून श्री. भागवत विठोबा बलक मु.वडगाव सिन्नर ता.सिन्नर,जि.नाशिक. पुणे विभागातून श्री.कांतीलाल किसन नलगे. मु.पो.नागरगाव , ता.शिरूर जि पुणे. कोल्हापुर विभागातून श्री.सुनील विष्णू भोसले मु.पो.धनगाव, ता.पलूस, जि.सांगली छ.संभाजीनगर विभागातून श्री.जयकिसन रामदास शिंदे मु.वरुडी पो.गेवराई ता. बदनापूर जि.जालना लातुर विभगातून श्री. महेश सोमनाथ जमाले कसबे तडवळा, ता. जि. धाराशिव अमरावती विभागातून श्री.निखील मधुकरराव तेटु मु.पो.कु-हा ता.तिवसा जि.अमरावती. नागपुर विभागातून श्री पवन ताराचंद कटनकार मु. पो. सिंदपुरी ता. तुमसर जि. भंडारा
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०२३ ठाणे डॉ.शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई मु.पो ओणी ता. राजापूर, जि.रत्नागिरी , नाशिक श्री. सुनिल चिंतामण अहिरराव मु.पो. बोहरे ता. अमळनेर जि. जळगांव , पुणे श्री. प्रवीण दिलीप माने मु.पो बैरागवाडी ता. माढा जि सोलापुर, कोल्हापूर श्री.प्रविण चंद्रकांत माळी मु.पो.शिरोळ, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर , छ. संभाजी नगर श्री.त्रिंबक सदाशिव कोकाट मु.पो ठाकर आडगाव,ता.गेवराई जि.बीड ,लातूर ज्ञान प्रबोधिनी, सोलापूर मु.पो.हराळी, ता.लोहारा, जि.धाराशिव ,अमरावती श्री.हेंमत किसनराव निखाडे मु.पो.गुरुकुंज मोझरी, ता.तिवसा,जि.अमरावती.
युवा शेतकरी पुरस्कार-२०२३ ठाणे श्री. गणपत हरी वाळिंबे मु. पो. आल्याणी ता. शहापूर, जि. ठाणे २ नाशिक श्री. समाधान रामचंद्र शिदे मु. तळेगांव वणी पो.तिसगाव ता. दिंडोरी जि.नाशिक, पुणे श्री. राहुल भारत बनकर , मु.पो बार्डी, ता.पंढरपूर जि सोलापुर, कोल्हापुर श्री.श्रीकांत महादेव घोरपडे रा.निसराळे, ता.सातारा, जि.सातारा ,छ. संभाजीनगर श्री.सोमीनाथ सुधाकर अवघड मु पो. वाकुळणी ता. बदनापूर जि. जालना ,लातुर श्री.भुषण भागवतराव रेंगे मु पो. जांब, ता.परभणी, जि.परभणी, अमरावती श्री.गणेश जगन्नाथ काळे मु.पो. तामशी ता.बाळापुर जि.अकोला, नागपुर सौ. प्रतिभा प्रमोद महाजन मु.पो. पवनी ता. जि. वर्धा.
उद्यानपंडीत पुरस्कार-२०२३ ठाणे डॉ.उत्तम सुर्यकांत फोंडेकर मु.पो.कुंभारमाठ, ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग, नाशिक श्री.टेड्या फुसा पाडवी मु.बालंबा (का) पो.डाब ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार, पुणे श्री. सदाशिव मनोहर चौघुले मु.पो. जुजारपूर, ता.सांगोला जि.सोलापुर 4 कोल्हापुर श्री.आनंदराव रामचंद्र धस मु. पो. धसवाडी ता.शिराळा जि.सांगली, छ. संभाजीनगर श्री.शिवाजी तुकाराम घावटे मु.पो सटाना ता. जि. छ.संभाजीनगर, लातूर सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड मु.पो.भोसी, ता. भोकर, जि. नांदेड ,अमरावती श्री.कृष्णराव अण्णाराव देशट्टीवार मु. खैरगांव दे पो.सोनबर्डी ता.पांढरकवडा जि.यवतमाळ., नागपूर श्री. दादा रामाजी फुंडे मु.खारी सुकळी पो.बाराभाटी ता.अर्जुनी/मोर जि.भंडारा
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) २०२३ ठाणे श्री.संतोष वालकू पाटील मु. कोलीवली पो.अनगाव ता. भिवंडी, जि. ठाणे, पालघर श्री. मोहन जगन्नाथ ठाकरे मु.वावेघर पो.कंचाड, ता.वाडा, जि.पालघर, रायगड श्री.विनय मारुती वेखंडे मु.वदप, पो.गौरकामथ, ता.कर्जत, जि.रायगड, सिंधुदुर्ग श्री. महेश रामदास संसारे, मु.पोमांगवली-संसारेवाडी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग, रत्नागिरी श्री. अनंत बाबाजी खांबे मु.मांडकी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, नाशिक श्री. रामहरी मोहन सुरसे मु. उजणी पो. दहीवाडी ता. सिन्नर जि. नाशिक, धुळे श्री. गणेश उत्तमराव खैरनार (पाटील) मु.पो. चिकसे ता. साक्री जि. धुळे, नंदुरबार श्री. जयवंतराव शिवलाल धगधगे मु.पो. आष्टे ता.जि. नंदुरबार, जळगाव श्री. संदिप चुडामन माळी मु.पो. मोरफळ ता. पारोळा जि. जळगांव ,अहिल्या नगर श्री. गणपतराव बाळासाहेब शिंदे , मु.पो. रहिमतपूर, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर, पुणे श्री. यतीन बापूराव घुले मु.पो काटेवाडी, ता.बारामती जि पुणे , सोलापुर श्री. प्रणव राजकुमार बिराजदार मु.पो निंबर्गी, ता. द. सोलापूर जि. सोलापूर ,सातारा श्री. ऋषिकेश जयसिंग ढाणे रा. निनाम पाडळी ता. जि. सातारा, सांगली श्री. विनोद संपतराव तोडकर मु.पो.कासेगाव, ता.वाळवा, जि.सांगली, कोल्हापूर श्री.बाळासो सदाशिव पाटील मु.पो.कोगे, ता.करवीर, जि.कोल्हापूर , छ.संभाजीनगर श्री.बाबासाहेब एकनाथ गायकवाड मु. नालेगाव ता. वैजापूर जि.छ. संभाजीनगर, जालना श्री.श्रीकांत बेलेश्वर आखाडे मु.पो.वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना ,लातूर श्री.राजपाल दिगंबर बिराजदार, मु.पो नेकनाळ, ता.देवणी, जि.लातूर , परभणी श्री.मंगेश प्रतापराव देशमुख मु.पो.पेडगाव, ता.जि.परभणी, हिंगोली श्री.बबन विठ्ठलराव ढोबळे मु. पो. असोला, ता.औंढा नागनाथ, जि.हिंगोली, नांदेड श्री.गोविंद बाबाराव शिनगारे मु.पो.बिजूर, ता.बिलोली जि.नांदेड ,धाराशिव श्री.शहाजी बळीराम कागदे मु.पो. ता.वाशी, जि.धाराशिव , वाशिम श्री.केशव मोतीराम भगत मु.पो.चांभई ता.मंगरुळपीर जि.वाशिम ,यवतमाळ श्री.विनोद रंगराव मैंद मु.उटी पो.मुडाना ता.महागांव जि.यवतमाळ ,अमरावती श्री.उमेश रामरावजी बगणे मु.शहापुर पो.हिरुळ पुर्णा ता.चांदुर बाजार जि.अमरावती, बुलढाणा श्री.रविंद्र राजकुमार तुरुकमाणे मु.पो.मादणी ता.मेहकर जि.बुलढाणा, नागपूर श्री. संतोष बाबाराव भगत मु.मुरादपूर पो. बेला ता. उमरेड जि. नागपूर, भंडारा श्री. नरेश रामचंद्र ढोक मु.पो. निलज ता. पवनी जि. भंडारा, चंद्रपूर श्री अरुण जैराम नरुले मु.पो. ता. नागभीड जि. चंद्रपूर ,गड चिरोली श्री विष्णुपद प्रभास गाईन मु. पो.शंकरनगर ता. आरमोरी जि. गडचिरोली
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) ठाणे श्रीमती सावित्री मदन वायडा, मु.करळगाव ता. पालघर जि. पालघर, नाशिक श्री. देवराम पांडु महाजन मु. पो. खडकी ता. कळवण जि. नाशिक, पुणे आदिवासी एकता शेतकरी गट, मु.पो. गुंजाळवाडी पठार, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर, लातुर श्री.गुणाजी रामन्ना पंडलवार मु.पो. अंबाडी, ता.किनवट, जि.नांदेड ,अमरावती सौ.वंदना सदानंद पांडे मु.खरबी पो.दराटी ता.उमरखेड जि.यवतमाळ, नागपुर श्री दयाराम सुखरू सिडाम मु.वडसाकला ता.एटापल्ली जि. गडचिरोली ,
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार-२०२३ ठाणे श्री.मनोज मोहन जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी, ता.पोलादपूर, जि.रायगड, नाशिक श्री. सुनील रघुनाथ वानखेडे नोडल अधिकारी विभागीय कक्ष,(स्मार्ट)नाशिक विभाग, नाशिक,पुणे श्री. नविनचंद्र हरिश्चंद्र बोऱ्हाडे उपकृषी अधिकारी, वडगाव-01, ता.कृ.अ. कार्यालय, मावळ, पुणे, कोल्हापुर श्री. अंकुश रामचंद्र सोनावले, सहाय्यक कृषी अधिकारी, खोजेवाडी, ता.जि. सातारा , छ. संभाजी नगर श्रीमती निभा आशिष डहाके तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, छ. संभाजीनगर, लातुर श्री. नानासाहेब एकनाथ साखरे उपकृषी अधिकारी,ता.कृ.अ. कार्यालय वाशी, जि.धाराशिव, अमरावती श्री. अनंतकुमार केशवराव देशमुख उपकृषी अधिकारी ता.कृ.अ. कार्यालय अकोट, जि.अकोला, नागपुर श्री मनोज झिबलराव गायधने उपकृषी अधिकारी गिरड, ता.कृ.अ. कार्यालय समुद्रपूर, जि.वर्धा, कृषी आयुक्तालय श्री.जितेंद्र मुरलीधर तारू कृषी अधिकारी, आयुक्त कक्ष, कृषि आयुक्तालय पुणे , मंत्रालय स्तर श्री.अमोल साखरकर , तत्कालीन अवर सचिव कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
विविध कृषी पुरस्कार सन २०२४
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – ठाणे श्री.यज्ञेश वसंत सावे मु.पो.ब्राम्हणगाव (झाई बोरीगाव), ता. तलासरी, जि.पालघर
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार – ठाणे श्री. आनंद जयंत देसाई मु.पो. पावस, ता.जि.रत्नागिरी, नाशिक श्री.कृष्णा धर्मा भामरे मु.पो.पिंगळवाडे, ता.बागलाण, जि.नाशिक, पुणे श्री. समीर मोहनराव डोंबे मु.पो.खोर, ता.दौंड, जि.पुणे , कोल्हापूर श्री.अशोक हिंदूराव खोत, मु.पो.उरुण-इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली., छ. संभाजीनगर श्री.अभिमान शाहूराव आवचर, मु.पो.वडवाडी, बोरखेड, ता.जि.बीड, लातूर श्री. श्रीकृष्ण सदाशिव शिंदे मु.पो.सुगाव ता.चाकूर, जि.लातूर ,अमरावती श्री.राहुल साहेबराव उभाले मु.पो. भिलोना, ता. अचलपूर, जि. अमरावती, नागपूर श्री.निलकंठ उर्फ बाबाराव कोढे मु-धापेवाडा (बु.), ता.कळमेश्वर, जि.नागपूर.
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार – ठाणे श्रीम. तनुजा महेश कंटे मु.चिरड, पो.म्हसा, ता.मुरबाड, जि.ठाणे, नाशिक सौ.सरला जगन्नाथ चव्हाण मु.पो.रायते, ता.येवला, जि.नाशिक, पुणे सौ. छाया तानाजी पवार मु. कुरणेवाडी, पो. पणदरे, ता. बारामती जि. पुणे ,कोल्हापूर सौ.पुष्पावती भिमराव मिठारी, मु.पो.बुर्ली, ता.पलूस, जि.सांगली., छ. संभाजीनगर सौ. रंजना हनुमंतराव काळे मु.डोमेगाव,ता.अंबड,जि.जालन, लातूर सौ. संजीवनी अंगद नागमोडे मु.पो. विलासनगर चिंचोलीराववाडी, ता.जि. लातूर, अमरावती सौ. वंदना देविदास धोत्रे मु.पो. विवरा, ता. पातुर, जि.अकोला 8 नागपूर सौ.शितल प्रशांत वानखेडे, मु.हातला, ता.काटोल, जि.नागपूर
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार – ठाणे श्री.किरण रोहिणी रघुनाथ लेले मु.बोरांडे-लेलेपाडा, पो.केव, ता.विक्रमगड,जि.पालघर, नाशिक श्री.दुल्लभ दयाराम जाधव मु.पो.निजामपूर-जैताणे, ता.साक्री, जि.धुळे.,पुणे श्री. खुशालचंद बाबासाहेब मोरे मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर, कोल्हापूर श्री.अनंत हणमंतराव माने, मु.पो.रहिमतपूर, ता.कोरेगाव, जि.सातारा., छ.संभाजीनगर श्री. गोवर्धन प्रभाकर उगले मु.पो. लालवाडी, पो.पारनेर, ता. अंबड जि. जालना ,लातूर श्री.विश्वनाथ गोविंदराव होळगे मु.पो.दापशेड, ता.लोहा, जि.नांदेड,अमरावती श्री. राजेंद्र महादेव ताले मु.पो. दिग्रस, बु.ता. पातुर, जि. अकोला, नागपूर श्री.नंदकिशोर किसनराव गावंडे मु.आमगाव (मदणी), पो.आकोली, ता.सेलू, जि.वर्धा
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- ठाणे श्रीम. मैरून हमीद नाकाडे मु.पो. नेवरे, ता. जि. रत्नागिरी, नाशिक श्री. लक्ष्मण बबन सोनावणे मु. बेलगाव, पो. अस्वली स्टेशन, ता. इगतपुरी जि. नाशिक, पुणे श्री. योगेश नामदेव धनगर (नालांदे) मु.पो. तांदुळवाडी, ता. बारामती, जी. पुणे,कोल्हापूर श्री.अभिजीत अच्युत डाके, मु.पो.काले, ता.कराड, जि.सातारा, छ. संभाजीनगर श्री.नरहरी नामदेवराव शिवपुरे, ठाकरे नगर, एन-२ सिडको छ. संभाजीनगर, लातूर श्री.विठ्ठल मारुती कटके मु.पो.रेणापूर, ता.रेणापूर, जि.लातूर, अमरावती श्री. कृष्णा यशवंतराव लोखंडे मु.पो. ता. जि. अमरावती,नागपूर श्री.मुखरू बुधाजी बागडे मु.पो.पालांदूर, ता.लाखनी, जि. भंडारा
युवा शेतकरी पुरस्कार ठाणे श्री. सुश्रुत अनिल पाटील मु.पो. वाणगाव, ता. डहाणू, जि. पालघर,४०११०३ 2, नाशिक श्री.श्याम नामदेव कातकाडे मु.पो.नायगाव, ता.सिन्नर, जि.नाशिक, पुणे श्री.सुरज सुखदेव आवताडे मु.पो. एखतपुर, ता. सांगोला, जि. सोलापूर,कोल्हापूर श्री.प्रतिक पोपटराव पवार, मु.पो.साखराळे, ता.वाळवा, जि.सांगली. ,छ. संभाजीनगर श्री.सागर राजेंद्र सोनावणे, मु.ताड पिंपळगाव,ता.कन्नड,जि.छ. संभाजीनगर, लातूर श्री.दिगंबर शंकर खपाटे मु.पो.बन्नाळी, ता.धर्माबाद, जि.नांदेड ,अमरावती श्री कुलदीप गजानन टोळे मु. पानोरा, पो. टाकळी, ता. दर्यापूर जि. अमरावती, नागपूर श्री.प्रांजल विठ्ठलराव वाघमारे मु.पवनार, ता.जि.वर्धा
उद्यानपंडीत पुरस्कार – ठाणे श्री.धनंजय श्रीकृष्ण केतकर मु.पो.भिले, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी, नाशिक श्री.बापूसाहेब भाऊसाहेब साळुंके मु.पो.वडनेर भैरव ता.चांदवड, जि.नाशिक,पुणे श्री. अमर अशोकराव भोसले मु.पो. सराटी, ता. इंदापूर जि. पुणे, कोल्हापूर श्री.बबन रामचंद्र मुळीक मु.पो.सासकल, ता.फलटण जि.सातारा., छ. संभाजीनगर श्री.रवि रामनाथ दाभाडे मु.दाभाडी गल्ली, तहसिल रोड, गेवराई, ता.गेवराई, जि.बीड. ६ लातूर श्री.राजाभाऊ बाबाराव रगड मु.उजलंबा, पो.उमरी ता.जि.परभणी, अमरावती श्री.नवीनकुमार अरुणकुमार पेठे मु.पो.ता. मोर्शी, जि. अमरावती ,नागपूर श्री.भगवंता गुलाबराव बनसिंगे मु.कोच्छी, ता.सावनेर, जि.नागपूर.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)- ठाणे श्री भगवान सखाराम तारमळे मु.उशीद, पो.फळेगाव, ता.कल्याण, जि. ठाणे, श्रीम. सुगंधा सचिन जाधव मु. पो. भाताने, ता. वसई, जि. पालघर, श्री. हरिश्चंद्र वसंत पाटील मु.पो.मसदबेडी, ता.पेण, जि.रायगड, श्री. दयानंद बाबाजी चौगुले मु.पो.खरवते-गावठाणवाडी, ता.राजापूर, जि.रत्नागिरी ,श्री. संतोष अंकुश गावडे मु. रानबांबूळी, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, नाशिक श्री.संदीप शिवाजी देसले मु.पो.गलवाडे, ता.चोपडा जि.जळगाव, श्री.पंडित रामभाऊ वाघ मु.पो.बार्डे, ता.कळवण, जि.नाशिक, श्री.संजय नथ्थू पाटील मु.पो.डोंगरगाव, ता.शहादा, जि.नंदुरबार, श्री.नितीन जयवंतराव ठाकरे मु.पो.काळगाव, ता.साक्री, जि.धुळे , पुणे श्री.गंगाधर प्रफुल्लचंद्र बिराजदार मु.पो. नीम्बर्गी, ता. द. सोलापूर जि. सोलापूर , श्री. गोवर्धन प्रल्हाद खेडकर मु.पो. भालगाव, ता. पाथर्डी जी. अहिल्यानगर, श्री.संतोष भिकाजी धुमाळ मु.पो.पेठ, ता.आंबेगाव जि. पुणे, कोल्हापूर श्री.हिंमतराव हिंदुराव पाटील, मु.पश्चिम सुपने, पो.वसंतगड, ता.कराड, जि.सातारा, श्री.दाजी आप्पाणा पाटील, मु.पो.कुंभारी, ता.जत, जि. सांगली ,श्री.अरविंद गणपतराव कल्याणकर, मु.घोळसवडे, पो.चांदोली, ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर, छ. संभाजीनगर श्री.प्रल्हाद दत्तात्रय येळेकर मु.पो. अलामगाव, हस्तपोखारी, ता.अंबड,जि.जालना ,श्री. भारत बापूराव जाधव, मु.पो. ताड पिंपळगाव, ता.कन्नड, जि.छ. संभाजीनगर,श्री.बाबुराव माणिकराव सलगर, मु.पो.मलनाथपूर,ता.परळी वै.,जि.बीड, लातूर अनिता आबासाहेब चव्हाण मु.पो. कारजखेडा, ता.धाराशिव, जि.धाराशिव, श्री. गणेश भगवानराव जगताप मु. वाला, पो. कामखेडा, ता. रेणापूर, जि. लातूर , श्री.पांडुरंग भगवानराव जाधव मु.पो.मिर्झापूर, ता.जि. परभणी, श्री.सुनील नामदेवराव चिमणपाडे मु.कुडली, ता.देगलूर जि.नांदेड , श्री.अनिल गंगाराम जाधव मु.पो.माळहिवरा, ता.जि. हिंगोली, अमरावती श्री. बबन तुकाराम कुटे मु.पो. घाटा ता. मालेगाव जि. वाशिम, श्री. गजानन शंकरराव वानखेडे मु.पो. सुकळी ज. ता. उमरखेड जि. यवतमाळ २७ श्री. रामभाऊ महादेवराव ढोरे मु.पो. ता. वरुड, जि. अमरावती, श्री. प्रितेश विजयराव डहाके मु.पो. डोणगाव, ता. मेहकर जि. बुलढाणा,श्री विठ्ठल पुरषोत्तम माळी मु.पो. बहादुरा, ता. बाळापुर जि. अकोला , नागपूर सौ.वंदना राधेश्याम वैद्य, मु.महालगाव/सुकळी, पो.पळसगाव, ता.साकोली, जि.भंडारा, श्रीमती रत्नमाला सुरेश आस्कर, मु.पिपरी (देश) ता.भद्रावती,जि.चंद्रपूर,श्री.पुरुषोत्तम झेलुजी जांभूळकर, मु.कोरेगाव, ता.आरमोरी, जि.गडचिरोली,श्री.अभय निळकंठराव ढोकणे, मु.आमगाव (मदणी), पो.आकोली, ता.सेलू, जि.वर्धा, श्री.नामदेव मारोती लांजेवार मु.पो.मांढळ, ता.कुही, जि.नागपूर
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) ठाणे श्री. दामू मधु मधे मु.राजदांडवाडी-ढवराळ, पो.वरसई, ता.पेण, जि.रायगड,, नाशिक श्री.प्रेमसिंग आमरा पावरा मु.पो.न्यू बोराडी ता.शिरपूर, जि.धुळे 3 पुणे श्री. शंकर जगन्नाथ केंगले मु. डोण पो. तिरपड ता. आंबेगाव, जि. पुणे 4 लातूर श्री. नामदेव परसराम फोले मु.पो. कुपटी खु ता. किनवट जि. नांदेड ,अमरावती श्री. रामगोपाल सखाराम मावस्कर मु.पो. टीटंबा ता. धारणी जि. अमरावती ,नागपूर श्री.प्रेमलशाह तुळशिराम अत्राम, मु.उमरवाही, पो.गटबोरी, ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील
कृषि सेवारत्न पुरस्कार – ठाणे श्री. अविनाश पद्माजी वडते, उप कृषी अधिकारी, उ.वि.कृ.अ. कल्याण, जि. ठाणे ,नाशिक श्री. संजय किसान भांड उप कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नाशिक ,पुणे श्री. सुखदेव ज्ञानदेव जमधडे उपकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शेवगाव जि.अहिल्यानगर, कोल्हापूर श्री.नामदेव शिवाजी परीट, कृषी उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, छ.संभाजीनगर श्री. पंडित किशनराव काकडे सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई, जि.बीड , लातूर श्री.सुर्यकांत बाबुराव लोखंडे उपकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय लातूर जि.लातूर ,अमरावती कु. रुपाली वसंतराव ठाकरे सहायक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी भातकुली जि. अमरावती,नागपूर श्री.गोकुलदास भिवाजी पाटील, उप कृषी अधिकारी, ता.कृ.अ.गोंडपिपरी, जि.चंद्रपूर, कृषी आयुक्तालय श्री.मनोहर यशवंत मुंढे कृषी उपसंचालक (विप्र-७), कृषी आयुक्तालय, म.राज्य, पुणे
००००
संध्या गरवारे/विसंअ
