Mumbai-Bengaluru Highway: पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीआयटीएमआरएल) पुणे मेट्रो लाइन ३ चा वापर करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि प्रवाशांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी वाकड मेट्रो स्थानकात 60 मीटर लांबीच्या पुलाचं बांधकाम पूर्ण केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने (पीआयटीसीएमआरएल) ‘पुणेरी मेट्रो’च्या वाकड स्थानकाजवळ ६० मीटर लांबीचा पादचारी पूल उभारण्याचे काम सोमवारी पहाटे पूर्ण केले. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या वाकड चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा पर्याय मिळाला आहे. या पुलाचा वापर मेट्रो प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही करता येणार आहे.
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे, वाकड चौकातून पायी रस्ता ओलांडणे धोकादायक ठरत होते. नव्या पुलामुळे मेट्रो स्थानक थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडले गेले असून, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अखंड मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. वाकड चौक हा पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक असल्याने, पुलाची उभारणी अभियंत्यांसाठी मोठे तांत्रिक आव्हान होते. वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होण्याच्या दृष्टीने संपूर्ण काम रात्री करण्यात आले. शनिवारी रात्रीपासून पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. नागरी अभियांत्रिकी पथकाने सलग दोन रात्री अखंड काम करून सोमवारी सकाळपर्यंत पुलाची दोन्ही टोके मेट्रो स्थानकाच्या संरचनेशी यशस्वीपणे जोडली.
Pune News: ‘पुणे मेट्रो २’चा चांदणी चौकापर्यंत विस्तार, वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपुलाची शक्यता; कुठून-कसा असेल मार्ग?
वाकड पूल हा महत्त्वाचा भाग असून, या पुलामुळे हजारो प्रवाशांना मेट्रोपर्यंत सुरक्षित आणि सुलभ प्रवेश मिळणार आहे. यामुळे वाकड चौक एकात्मिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित होण्यासही चालना मिळेल. वाकड मेट्रो स्थानकाची बहुतांश नागरी कामे पूर्ण झाली असून, अंतिम टप्प्यातील फिनिशिंगची कामे सुरू आहेत. या परिसरात सध्या दिशादर्शक फलकही बसविण्याचेही काम पूर्ण झाले आहे.
Pune Ring Road: ‘रिंग रोड’मुळे पुण्यातील बांधकामे बाधित होणार, PMRDAची कबुली; मार्गाच्या नकाशात मोठा गोंधळ
मार्गाची चाचणी पूर्ण
‘पुणेरी मेट्रो’ लाइन ३ने संपूर्ण २३ किलोमीटर उन्नत मार्गावर चाचणी पूर्ण केली असून, आता वैधानिक मंजुरीची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर मार्गावरील १२ स्थानके सुरू केली जाणार आहेत. संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास सुमारे दीड तासांऐवजी अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार असल्याने आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा