• Mon. Jun 29th, 2026

    Ganeshotsav 2026: ‘पीओपी’ वाद पुन्हा तापणार! गणेशमूर्तींचे जलस्त्रोतांत विसर्जन करण्यावर प्रश्नचिन्ह, 1 जुलैला हायकोर्टात सुनावणी

    Ganeshotsav 2026: ‘पीओपी’ वाद पुन्हा तापणार! गणेशमूर्तींचे जलस्त्रोतांत विसर्जन करण्यावर प्रश्नचिन्ह, 1 जुलैला हायकोर्टात सुनावणी

    Ganeshotsav 2026: पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाचा वाद यंदा पुन्हा तापणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बुधवार, १ जुलै रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

    पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) बनवण्यात आलेल्या सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षापुरती आणि या वर्षीच्या मार्चपर्यंतच्या उत्सवांपुरती परवानगी दिली असली, तरी हा विषय यंदा पुन्हा चर्चेत येणार आहे.

    केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ज्या बदललेल्या भूमिकेच्या आधारे उच्च न्यायालयाचा हंगामी आदेश आला त्या भूमिकेला पर्यावरणप्रेमी जनहित याचिकाकर्त्यांनी याचिकादुरुस्तीद्वारे आव्हान दिले आहे. त्याविषयी एक जुलै रोजी न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

    Maharashtra TimesOmraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रि‍पदाबद्दल केली मोठी घोषणा
    ‘सीपीसीबी’च्या १२ मे २०२० रोजीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे पीओपी मूर्तींवर पूर्ण बंदी असूनही त्याची अंमलबजावणीच होत नसल्याचे पाहून उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ३० जानेवारी २०२५ रोजी पूर्ण बंदीचा आदेश दिला होता. त्यानंतर मूर्तीकारांच्या अनेक संघटनांनी ‘पीओपी’च्या समर्थनार्थ याचिका केल्या, तर राज्य सरकारने ‘पीओपी’प्रश्नी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचा अभ्यास अहवाल मिळवून त्याआधारे ‘सीपीसीबी’ला विनंती केली. त्यानंतर ‘१२ मे २०२० रोजीची मार्गदर्शक तत्त्वे ही मार्गदर्शक सूचनांच्या स्वरूपात आहेत.

    परंतु पीओपी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहांत करण्यास बंदी कायम राहील. त्यामुळे शिफारशींतील अटींप्रमाणे विसर्जन होण्याविषयी राज्य सरकारने निर्णय घ्यावा,’ अशी भूमिका ‘सीपीसीबी’ने मांडली होती. त्यानंतर राज्य सरकारने धोरण आणले. त्याआधारे उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी हंगामी आदेश दिला. त्यानुसार, केवळ सहा फुटांच्या वरील मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतांत करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, अशी परवानगी केवळ मार्च-२०२६पर्यंतच्या उत्सवांपुरती असेल, असे न्यायालयाने त्या आदेशात स्पष्ट केले.

    Maharashtra TimesPabe Ghat Accident : राजगड किल्ल्यावर जाताना पाबे घाटात बस 40 फूट खोल दरीत, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढलं, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
    या पार्श्वभूमीवर, रोहित जोशी व अन्य पर्यावरणप्रेमींनी आणि शाडूच्या मातीने मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांनी ॲड. रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत सुधारित याचिका केली आहे. ‘‘सीपीसीबी’ने बदललेली भूमिका अत्यंत चुकीची आहे. जल प्रदूषण प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या अधिकाराप्रमाणे बंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सीपीसीबीच्या वकिलांच्या न्यायालयातील तोंडी म्हणण्याने आणि प्रतिज्ञापत्राद्वारे वैधानिक बदल होऊ शकत नाही. २०२०ची मार्गदर्शक तत्त्वे बदलणार असल्याचे सीपीसीबीने म्हटलेले नाही.

    या मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व राज्यांतील प्रदूषण नियंत्रण मंडळांवर असते. मात्र, सीपीसीबीच्या अशा बदललेल्या विचित्र भूमिकेमुळे संपूर्ण देशातील अनेक राज्यांत पीओपी मूर्तींबाबत गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे याविषयीचे एक ऑगस्ट २०२५ रोजीचे धोरण रद्द करावे व २०२०ची मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक असल्याचे घोषित करण्याचा आदेश सीपीसीबीला द्यावा,’ अशी विनंती सुधारित याचिकेत करण्यात आली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा