ऑपरेशन टायगरपासून वादात सापडलेले खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटतच चालल्याचं दिसतंय. धमकी, गलिच्छ भाषा आणि आता तर थेट पत्रकारांनाच धमकी दिल्यामुळे संजय पाटलांवर चौफेर टीका होताना दिसतेय. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यापासून त्यांची ही वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलीच महागात पडत आहेत. या धमकी प्रकरणानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय पाटलांशी संवाद साधला आहे.