• Mon. Aug 17th, 2026

 कृषी पुरस्कार सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 23, 2026
 कृषी पुरस्कार सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

मुंबई, दि. २३ : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार, १ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे पुरस्कार सोहळा होणार आहे. २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान एकत्रितपणे करण्यात येणार असून, या सोहळ्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमंत्रीत केले आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, नाविन्यपुर्ण कल्पना आणि कृषी विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रगतशील शेतकरी, कृषी संस्था आणि कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व घटकांच्या योगदानाचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या पुरस्कारांमुळे कृषी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण होतील आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे असे ते म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed