नाशिक विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी मुंबईत येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करणार अशी घोषणा केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : नाशिक विधान परिषद निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये महायुतीचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे विजयी होतील, अशी आशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना होती. महायुतीत ही जागा आपल्याला सुटावी यासाठी भाजपकडून प्रचंड प्रयत्न करण्यात आले होते. पण तडजोडीअंती ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. पण भाजपच्या काही इच्छुकांनी बंडखोरी केली. यामध्ये गोकुळ गिते हे देखील होते.
शिवसेनेकडून भाजपच्या बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. विशेष म्हणजे यामध्ये गोकुळ गिते यांचादेखील समावेश होता. इतर सर्वांनी माघार घेतली. गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. गोकुळ गिते हे माघार घेण्यास तयार नव्हते. मंत्री उदय सामंत, भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गिते यांचे मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. प्रचंड प्रयत्नानंतर गोकुळ गिते यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. पण निकाल त्यांच्याच बाजूने लागला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर आता गोकुळ गिते यांनी मोठी घोषणा केली आहे.
शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची घोषणा
विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गोकुळ गिते यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क केला. यानंतर ते विशेष विमानाने नाशिकहून मुंबईत दाखल झाले. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यानंतर गोकुळ गिते यांनी उदय सामंत आणि श्रीकांत शिदे यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार, अशी घोषणा केली.
गोकुळ गिते नेमकं काय म्हणाले?
“माझ्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी निडणूक पुढे नेली. मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे आणि बाकीचे आमदार आले होते. मी त्यांना सांगितलं होतं की, माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. कारण त्यांना आपला भविष्यातील विजय दिसत होता”, असं गोकुळ गिते म्हणाले.
गिते शिवसेनेच्या पक्ष संघटनेचं काम करण्यास इच्छुक
“मी इच्छा व्यक्त केली की, मी निवडून आलो आहे. या मतदारसंघाच्या मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिला आहे. मी आपल्या पक्षामध्ये सहयोगी सदस्य म्हणून काम करायला तयार आहे. मग त्यांनी मला आज संध्याकाळी या, असं सांगितलं. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या मतदारांचे भविष्यात कामे करण्यासाठी, त्यांच्या काही अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाचा सहयोगी म्हणून काम करण्यास परवानगी दिलेली आहे. भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर ती सुद्धा मी पार पाडेन अशी मी ग्वाही देईन”, असं गोकुळ गिते म्हणाले.
“मी एकनाथ शिंदे यांच्या कामांनी पूर्वीपासून प्रभावित आहे. आमचे गणेश गिते स्थायी सभापती असताना अनेकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी गाठभेट झालेली आहे. त्यांच्या कामाची पद्धत पाहून मी प्रभावित असून माझी आधीपासून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे”, असं गोकुळ गिते म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा