• Thu. Jun 25th, 2026
    ‘आई सॉरी…’ चिठ्ठी लिहून JEEच्या विद्यार्थिनीची एक्झिट; अभ्यासाचा ताण सहन न झाल्यानं टोकाचा निर्णय

    JEE Student Ends Life: अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने नागपुरात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

    जेईईच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी नागपूर: आई, आय ॲम सॉरी, मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही, मला माफ कर’ अशा आशयाची इंग्रजीत चिठ्ठी लिहून जेईईची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना येथे घडली.

    वैदेही सुनील गुलगे (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बारावीत होती. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, वैदेहीची आई वंदना या शिवणकाम करतात. वैदेहीने जेईईची तयारी करण्यासाठी शिकवणी लावली. मात्र, तिला अभ्यासाचा ताण जाणवायला लागला. ती तणावात राहायला लागली. शुक्रवारी सायंकाळी वंदना या कामानिमित्त बाहेर गेल्या. यावेळी वैदेही ही अभ्यास करीत होती. आई गेल्यानंतर काही वेळाने वैदेहीने लोखंडी हुकला साडी बांधून गळफास घेतला. रात्री तिची आई परतली असता ही घटना उघडकीस आली.

    Maharashtra TimesAmit Shah Kolhapur Visit: हा देश काही धर्मशाळा नव्हे! कोल्हापुरात अमित शहांनी काँग्रेस, उद्धव ठाकरेंना डिवचलं
    वंदना यांनी हंबरडा फोडला. शेजारी जमले. एका शेजाऱ्याने वाठोडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करुन वैदहीचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी वैदेहीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मला जेईईच्या अभ्यासाचा ताण होत आहे. आई मला माफ कर’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. वैदेहीच्या आत्महत्येप्रकरणी वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    VIDEO | संजय राऊतांनी खासदारांना शिव्या दिल्या, बावनकुळेंनी काय सल्ला दिला?

    तर दुसऱ्या एका घटनेत, नीट फेरपरीक्षा अवघ्या एक दिवसावर आली असताना, गाझियाबादच्या प्रतापविहार येथील एका २२ वर्षीय नीट परीक्षार्थीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जतीन कुमार असे मृताचे नाव आहे. तो वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करीत होता. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या खोलीत अभ्यास करीत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी त्याला उठवण्यासाठी गेले असता तो मृतावस्थेत आढळला. घटनेनंतर विजयनगर पोलिस ठाण्याचे पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले. ‘खोलीत छताच्या पंख्याला बांधलेला तुटलेला फास आढळला, तर मृतदेह जमिनीवर पडलेला होता,’ असे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी जतीनच्या मोबाइलमधून एक मिनिट चार सेकंदांचा व्हिडिओ मिळवला, जो त्याच्या मृत्यूपूर्वी काही क्षण आधी रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपली अभ्यासाची खोली दाखवली आणि ‘आज काहीतरी वेगळे करण्याचा विचार करीत आहे,’ असे म्हटले. त्याने छताच्या पंख्याला लटकलेल्या फासाकडेही इशारा केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा