• Sat. Aug 15th, 2026

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 19, 2026
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी – महासंवाद

मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मुख्य कार्यक्रम सौमय्या महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षी मुख्य कार्यक्रमासोबतच बोरिवली येथील शैलेंद्र स्कूल आणि विलेपार्ले येथील एन. एम. कॉलेज येथेही योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्र आणि दीक्षा कदम संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, नामांकित खेळाडू तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. योगाबाबत जनजागृती व्हावी आणि त्याचा अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योग दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

०००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed