• Fri. Jun 12th, 2026

    महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 12, 2026
    महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने माजी खासदार आणि असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांसाठी युवकांना योग्य प्रशिक्षण मिळण्याबाबत चर्चा झाली.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. पायाभूत सुविधांचे महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्राने तेथील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्रात आणून प्रशिक्षण उपलब्ध करुन द्यावे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियानांतर्गत इतर राज्यांमध्ये विविध खेळांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, सहसचिव डॉ. प्रदीप खांडरे, ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे महासचिव सुंदर अय्यर, त्रिपुरा ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव तसेच ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे सहसचिव सुजित रॉय यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    0000

     

     

    लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
    राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed