• Fri. Jun 12th, 2026
    VIDEO : ठीक आहात का? परप्रांतीय कॅब चालकाच्या मारहाणीत दुखापत, ठाण्यातील वृद्धाला राज ठाकरेंचा फोन

    Thane Cab Driver Assaults Old Man : ठाण्यात परप्रांतीय ओला चालक निशांत धर शुक्ला याच्या मारहाणीत जखमी झालेले वृद्ध सरोज दस्तुर यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर परप्रांतीय ओला चालक निशांत धर शुक्ला याच्या मारहाणीत जखमी झालेले वृद्ध सरोज दस्तुर यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट राज ठाकरेंशी कॉलवरुन बातचित करुन दिली.

    काय झाला संवाद?

    राज ठाकरे : कसे आहात तुम्ही ठीक आहात?
    सरोज दस्तुर : मी ठीक आहे, पाय ठीक आहे, सर्जरी बाकी आहे, सूज कमी झाली की करता येईल, त्याचीच वाट पाहतोय
    सरोज दस्तुर यांची पत्नी : आमचा फोकस सध्या त्यांच्या रिकव्हरीवर आहे. पण तुम्ही फोन करुन विचारपूस केलीत त्याबद्दल आभार
    राज ठाकरे : काळजी घ्या आणि काही लागलं तर सांगा
    Maharashtra TimesPunjab Doctor Death : पतीचे हॉस्पिटलमधील तरुणीशी संबंध, CCTV मध्ये नको ते दिसलं, सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरचा गूढ अंत

    काय आहे प्रकरण?

    रस्त्यावर थुंकल्याबाबत जाब विचारल्याने परप्रांतीय ओला चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात मंगळवारी घडली होती. या मारहाणीत सरोज दस्तुर यांच्या पायाला दुखापत झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच शिवसेना व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या चालकाला शोधून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने दखल घेऊन ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना या चालकावर कठोर कारवाईचे आदेश दिले. तर आरोपीला रात्री अटक करण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सरोज दस्तुर यांची चौकशी केली.

    मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या, मनसे आक्रमक! संदीप देशपांडे यांचा कडक इशारा

    वृद्ध दस्तुर दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयासमोरील फूटपाथवरून जात होते. यावेळी चालक निशांत धर शुक्ला (४०) रस्त्यात थुंकल्याचे त्यांनी पाहिले. याबाबत सरोज यांनी त्याला जाब विचारत असे कृत्य करू नये, असे सांगितले. त्यामुळे शुक्लाने त्यांना धक्काबुक्की केली व मारहाण करत फूटपाथवर ढकलले. त्यात त्यांना दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला. या प्रकाराचा व्हिडीओ समोर येताच शिवसेना (उबाठा) पक्षाचे शाखाप्रमुख सुमित बोराटे व शिवसेनेचे शाखाप्रमुख नितेश पाटोळे यांनी शुक्लाला शोधून वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच, या प्रकरणी परप्रांतीय चालकावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस आयुक्त डुंबरे यांना दिले. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही सरोज यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.
    Maharashtra TimesLondon Marathi family Death : लंडनमध्ये मराठी परिवाराचा हृदयद्रावक अंत, एक आठवड्याआधी काय घडलेलं, शेजारी महिलेने सांगितलं पैंच्या घरातून अचानक ओरडण्याचे आवाज

    मुजोरी वाढल्याचा मनसेचा आरोप

    ‘वृद्ध नागरिकाने हटकल्यानंतर त्यांना मारहाण करण्याची मुजोरी या परप्रांतीय नागरिकांना येथील राजकीय पक्षांमुळे येते’, असा आरोप मनसे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. ‘या मुजोर नागरिकांना मनसेस्टाइल धडा शिकवला जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा