• Mon. Sep 14th, 2026

‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 8, 2026
‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद – महासंवाद

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सोमवारी (दि. 8) रोजी आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत लोकभवन, मुंबई येथे संवाद साधला. हा कार्यक्रम भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे तर्फे आयोजित करण्यात आला होता. ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी राज्यपालांनी आपल्या भाषणात जबाबदारी, विनम्रता आणि सामाजिक सहभाग या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविधतेचा स्वीकार करण्याचे, शिस्त व चिकाटीने काम करण्याचे तसेच व्यावसायिक उत्कृष्टतेसोबत सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.

राज्यपालांनी शिक्षण सुधारणा, कौशल्य विकास, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्व देखील अधोरेखित केले. त्यांनी शिक्षण मंत्रालय व सहभागी संस्थांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण विभागचे उपसचिव श्रेयांश मोहन, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER) पुणे येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. मनवा दिवेकर तसेच वरिष्ठ प्रधान तांत्रिक अधिकारी डॉ. शांती कलीपटनपू, तिरुपती येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील मानव व सामाजिक विज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. बिभूती कच्छप, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. रामामूर्ती, आयआयएसईआर येथील प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाणे, आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे सदस्य, आयसरचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed