• Tue. Jun 9th, 2026

    Crime News: चिमुकल्या पुतण्याने काकाला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; भीतीतून काकाने भयंकर पाऊल उचललं!

    Crime News: चिमुकल्या पुतण्याने काकाला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; भीतीतून काकाने भयंकर पाऊल उचललं!

    सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर गावात पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली असून सख्ख्या काकाने पाच वर्षीय चिमुकल्या पुतण्याचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे. मंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृत पाच वर्षीय चिमुकल्याच्या काकाला अटक केली असून कोर्टात हजर केले असता कोर्टाने 11 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अंकुश परशुराम कास्तार (वय २५, रा. हलसंगी, ता. इंडी, विजयपूर, सध्या रा , बरुर, ता दक्षिण सोलापूर) असं अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. समर्थ कास्तार (वय 5 वर्षे, रा, बरुर, ता दक्षिण सोलापूर) असे मृत मुलाचे नाव आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, चिमुकल्या पुतण्याने काकाला परस्त्रीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. अनैतिक संबंधाचे बिंग फुटेल या भीतीमुळे सख्ख्या काकाने पाच वर्षीय चिमुरड्या पुतण्याचा गळा आवळून खून केला आहे. सुरुवातीला संशयित आरोपी अंकुश कासार याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आहे.

    अनैतिक संबंधाचे बिंग फुटेल या भीतीने केलं कांड
    समर्थ कासार हा शनिवारी दुपारी काकाच्या घरी गेला होता. पाच वर्षीय चिमुकल्याने काकाला एका परस्त्रीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. चिमुकल्याला पाहून काका घाबरून उठला. त्यावेळी हा प्रकार तो त्याच्या आजीला सांगेल आणि आपले अनैतिक संबंध उघड होतील म्हणून काकाने चिमुकल्याचा गळा आवळून खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. मंद्रूप पोलिसांनी अंकुश परशुराम कास्तार (वय २५, रा. हलसंगी, ता. इंडी, विजयपूर) याला अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

    आजीचा लाडका समर्थ नाहक मारला गेला
    दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे यल्लप्पा कास्तार व अंकुश कास्तार आणि समर्थच्या आईची आई (आजी) देखील जवळ राहायला आहे. समर्थ हा आजीचा लाडका होता, तो एक वर्षाचा असल्यापासून आजीजवळच राहात होता. ४ जून रोजी समर्थ हा काकाकडे जातो असे सांगून घरातून गेला होता. पण, काही वेळाने काका अंकुश हा समर्थला बेशुद्धावस्थेत घेऊन त्याच्या आजीच्या घराकडे आला. समर्थला बरूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच समर्थचा मृत्यू झाला होता.

    ती महिला कोण?
    मंद्रुप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तपासाची चक्रे फिरविली आणि समर्थच्या काकावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, उपनिरीक्षक राज डांगे, संदीप काशीद, सहायक पोलिस उपनिरीक्षक बापू शिंदे, हवालदार श्रीराम आदलिंगे, लखन पवार, माजिद शेख, अश्पाक मियावाले, किरण तोडेकर, श्रीशैल शिवणे, पोलिस पाटील श्रीशैल स्वामी यांनी पार पाडली. चिमुकल्या समर्थने अंकुशला कोणासोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते, याचा तपास पोलिस करत आहेत.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील युजर चार्जेस प्रश्नावर १५ दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
    समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
    बुटीबोरी येथील फूडपार्क प्रकल्पाला इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्याबाबत कार्यवाही करा – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed