Nashik News: मनमाडमध्ये शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे घर कोसळून पतीचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
शनिवारी मनमाडमध्ये जोरदार वादळासह मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रमाबाई नगर येथे राहणारे संजय विठ्ठल संसारे यांचे घर पावसामुळे पडले. ढिगाऱ्याखाली संजय संसारे आणि त्यांची पत्नी अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून दोघांना बाहेर काढले आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र संजय संसारे यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
Nashik Onion: कांदा खरेदीला उद्या मुहूर्त; NAFED, NCCFमार्फत थेट खरेदी, अधिकारी साधणार समन्वय
दरम्यान, संसारे यांचा मृत्यू झाल्यानंतर नगरसेवक विशाल आहिरे व साथीदार उपजिल्हा रुग्णालयात आले. उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करीत त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यानंतर वाद वाढून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे नमूद आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीराज शिंदे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विशाल व प्रमोद आहिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे; पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
विजांच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा अनेक तास बंद होता. नंतर वीज सुरू झाली तरी काही भागात व्होल्टेज कमी असल्याने अडचणी आल्या. रविवारीही मुख्य बाजारपेठेसह बहुतांश भागात वीज नसल्याने शहर अंधारात गेले. दोन दिवस तासंतास वीज गायब राहिल्याने कंपनीच्या कारभाराबाबत नागरिकांत संताप वाढला.
Nagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
रविवारी (दि. ७) सायंकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मनमाडला तडाखा दिला आणि काही ठिकाणी गारा पडल्या. अचानक पावसामुळे रविवारच्या आठवडे बाजारात गेलेल्या महिलांमध्ये भीती निर्माण झाली, तर मुसळधार पावसात भाजी विक्रेत्यांचे मोठे हाल झाले.
