• Sun. Jun 14th, 2026
    Mumbai Crime : शरीरात लपवून सोन्याची तस्करी, DRIची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं सोनं जप्त; मोठ्या कर्मचाऱ्यांचा समावेश

    Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Gold Seized : डीआरआयच्या मुंबई विमानतळावरील कारवाईत सुमारे 3.2 किलो परदेशी सोन्याची पावडर जप्त करण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे.

    मुंबई विमानतळ ५ कोटींचं सोनं जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई…मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईत रोज कुणी ना कुणी आपलं पोट भरण्यासाठी येत असतं. या शहराला ‘स्वप्नांचं शहर’ देखील म्हटलं जातं. या शहरात दररोज अब्जावधींची उलाढाल होत असते, त्यामध्ये अवैध धंदे, तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच्याही घटना समोर येतात. याचदरम्यान, ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

    5 कोटी रुपयांचं सोनं जप्त

    डीआरआयच्या मुंबई विमानतळावरील कारवाईत सुमारे 3.2 किलो परदेशी सोन्याची पावडर जप्त करण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे. या प्रकरणात 3 बांगलादेशी व श्रीलंकन नागरिक, 3 विमानतळ कर्मचारी आणि 1 रिसिव्हर अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या माहितीनुसार, हे सोनं बँकॉकहून मुंबईमार्गे प्रवास करणारे परदेशी नागरिक शरीरात लपवून आणत होते. विमानतळावरील काही कर्मचारी हे सोनं बाहेर काढून स्थानिक एजंटांकडे पोहोचवत होते. कारवाईदरम्यान दोन बसचालक आणि एका कोच मॉनिटरला सोन्याची डिलिव्हरी करताना पकडण्यात आलं.
    Maharashtra TimesRain Update : उषःकाल होता होता… पावसाचा लपंडाव, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोलाची माहिती
    दरम्यान, कस्टम्स कायदा 1962 अंतर्गत सोनं जप्तीची कारवाई करण्यात आली असून संपूर्ण तस्करी साखळी उद्ध्वस्त करण्यात डीआरआयला यश आलं आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून, हे सोनं नेमकं कुठे जाणार होतं? कुठून आलं होतं? याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

    मुंबई लोकल अचानक ठप्प, सिग्नलच मिळेना

    पनवेल रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या उद्देशाने चोरांनी सिग्नल केबल यंत्रणेची तोडफोड केल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक शुक्रवारी सायंकाळी एक तास बंद होती. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) शोधमोहीम सुरू केली आहे. पनवेल यार्ड परिसरात सीसीटीव्ही नसल्याने त्याचा फायदा घेत केबलचोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे.
    Maharashtra TimesBandra Terminus: वांद्रे टर्मिनसची क्षमता 50 टक्क्यांनी वाढणार, पूर्वेकडील परिसराचा कायापालट होणार; विस्तारीकरणाला सुरूवात
    पनवेल स्थानकाच्या अलीकडे शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे सिग्नल यंत्रणा अचानक बंद पडली. सिग्नल मिळत नसल्याने लोकल जागीच खोळंबल्या. याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांसह आरपीएफ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिग्नल केबलसह अन्य यंत्रणेची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील सिग्नल यंत्रणेला फटका बसला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा