• Mon. Jun 15th, 2026
    Maharashtra Salon Price Hike : दाढी करणं आणि केस कापणं महागलं, सलून सेवांच्या दरात 20 टक्के दरवाढ

    छत्रपती संभाजीनगर : वाढती महागाई, आर्थिक ओढाताण आणि खर्च वाढल्याने सलून व्यावसायिकांची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यातील ग्रामीण आणि शहरातील भागातील सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 6 जूनपासून लागू करण्यात आली. याविषयी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर झालेल्या अस्थिर परिस्थितीचा फटका सर्वसामान्यांसह लहान व्यावसायिकांनाही बसत आहे. इंधन दरवाढीमुळे विविध वस्तूंचे दर वाढलेले आहेत, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

    सलून व्यवसायासाठी लागणारे शॅम्पू, हेअर कलर, ब्लीच, फेशिअल क्रिम, जेल, वॅक्स, डिस्पोजेबल वस्तू, टॉवेल धुण्याचे साहित्य, निर्जंतुकीकरणासाठी लागणारे साहित्य व अन्य अनेक वस्तू पेट्रो केमिकल्स उद्योगाशी संबंधित आहे. परिणामी इंधन दरवाढीचा थेट परिणाम या वस्तूंवर झाला आहे. या वस्तू उत्पादित करणाऱ्या अनेक देशी -विदेशी कंपन्यांनी दरवाढ केली आहे, असं पत्रकात म्हटलं आहे.

    प्रयत्न करुनही सलून व्यावसायिकांना आता जुने दर ठेवणे अवघड झाले आहे. वाढत्या महागाईचा फटका सलून व्यावसायिकांनाही बसत आहे. या बाबी पाहून सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्यातील लाखो नाभिक कुटुंबांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, उपाध्यक्ष विष्णू वखरे, कार्याध्यक्ष श्याम आस्करकर, सरचिटणीस घनश्याम वाघ, कोषाध्यक्ष रामदास पवार, चिटणीस विकास मदने आदींनी केले आहे.

    दुसरीकडे महागाई, इंधन दरवाढ विरोधात ठाकरे गटाचं जनआक्रोश आंदोलन

    दरम्यान, महागाई, इंधन दरवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारी आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल, महागाई हटाव, मोदी हटाव, अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला. महिलांनी गॅस सिलिंडरला हळदीकुंकू वाहून त्याचे पुजन केले, तर राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला.

    पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ, वाढलेली महागाई विरोधात क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ‘महंगाई के अच्छे दिन’ जनआक्रोश आंदोलन केले. शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला सायकवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फेरी मारण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

    महागाई रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय अशा घोषणा दिल्या. सिलिंडर समोर ठेऊन महिलांनी लाटण्यांनी थाळ्या वाजवल्या. त्यानंतर डिजेवर महागाईचे गाणे टाळांच्या गजरात वाजवले. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी सिलिंडरला हळदी-कुंकू व फुले वाहून सिलिंडरला ओवाळून त्याचे पुजन करत गॅस दरवाढीचा निषेध केला.

    राज्य शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी केली. फसवी कर्जमाफी करण्यात आली असून ही तर कर्जवसूलीसाठीचा शासन निर्णय आहे, असा आरोप करण्यात आला. फसवी कर्जमाफी रद्द करा, शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा, सातबारा कोरा करा या घोषणा देण्यात आल्या.

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed