• Fri. Jun 5th, 2026
    मुंबईकर कुटुंबाने कोल्हापुरात घर बांधलं, सुट्टीत गावी मुक्काम, टेम्पोखाली चिरडून चौघांचा मृत्यू, वृद्ध आजीवर वाईट वेळ

    Road Accident : ​आजरा तालुक्यात कुटुंबाच्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. त्यानंतर तो टेम्पो रस्त्याच्या कडेला ओढ्यात उलटला. त्याखाली दबले गेल्याने आई-वडील आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई/कोल्हापूर : कोल्हापूरमधील होन्याली येथे एका टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने गुरुवारी मुंबईतील पवई भागात राहणारे तिशीतील जोडपे आणि त्यांची ७ व १० वर्षे वयाची दोन मुलं अशा चौघांचा मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी होती, की टेम्पो उलटला आणि त्याखाली बाईकस्वार चौघेही कुटुंबीय अडकले. दीपक चांदे (वय ३९), त्यांची पत्नी शोभा (वय ३५) आणि त्यांची मुले जय (वय १०) व पूर्वा (वय ७) अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    दीपक आणि शोभा चांदे यांनी होन्याली येथे घर बांधले होते. मुलांच्या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सगळे तिथे गेले होते. ५ जून रोजी परतण्यापूर्वी सरपंचांच्या नातेवाईकांना भेटायला जात असताना हा अपघात घडला.

    टेम्पोखाली चिरडल्याने चौघांचा मृत्यू

    आजरा तालुक्यातील उत्तूर-बहिरवाडी मार्गावर त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. त्यानंतर तो टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात उलटला. त्याखाली दबले गेल्याने आई-वडील व दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला.

    नव्या घरात सुट्ट्या घालवल्या

    पवईचे रहिवासी असलेले चांदे कुटुंब उन्हाळी सुट्टीसाठी आठ दिवसांपूर्वीच होन्याली येथे आले होते, अशी माहिती गावच्या सरपंच स्मिता पाटील यांनी दिली. “मुंबईत अनेक वर्षे काम केल्यानंतर दीपक यांनी २०२५ मध्ये हे घर बांधले होते आणि घराच्या अंतर्गत सजावटीची व फिटिंग्जची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ते तिथे आले होते. नवीन बांधलेल्या घरात कुटुंबाचा हा पहिलाच दीर्घकालीन मुक्काम होता,” असे सरपंचांचे पती विनायक पाटील यांनी सांगितले.
    Maharashtra TimesAkanksha Chaturvedi : आई, बाबा मला माफ करा, NEET परीक्षा पुन्हा देण्याचं धाडस नाही, नागपुरात विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं
    दीपक यांच्या आधार कार्डवरून मृतांची ओळख पटली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार टेम्पो चालकाचा शोध सुरु केला आहे.

    सरपंचाच्या कुटुंबाला भेटायला निघालेले

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली; त्यावेळी चांदे दाम्पत्य आपल्या मुलांसह दुचाकीवरून सरपंच स्मिता पाटील यांच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी डुंडागे गावी जात होते. त्यांना शुक्रवारी मुंबईला परतायचे होते.

    मामा जयंत पाटील यांना फोन, तर शरद पवारांची भेट घेणार; बिनविरोध होताच प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया

    भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे हे चौकोनी कुटुंब फेकलं गेलं आणि टेम्पो उलटून एका नाल्यात पडला. टेम्पोखाली अडकलेल्या चौघांनाही घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.

    वडील, भाऊ गेले, आता चौघांचा मृत्यू

    विनायक पाटील यांनी सांगितले की, दीपक चांदेची आई मुंबईहून आल्यानंतर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जातील. “दीपकचे वडील आणि थोरल्या भावाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या भावालाही दोन मुले आहेत. आता कुटुंबात केवळ त्याची वृद्ध आई आणि वहिनी उरल्या आहेत” असेही त्यांनी नमूद केले.
    Maharashtra TimesDelhi Fire : माझं कर्तव्य होतं ते! हॉटेलात आग, व्यापाऱ्याने लोकांच्या सुटकेसाठी गाद्या पसरल्या, दोन लाखांचं नुकसान, पण 8 जीव वाचले!
    नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “धडकेनंतर तो टेम्पो रस्त्यालगतच्या एका नाल्यात उलटला. त्या दोन मुलांची बॉडी उलटलेल्या टेम्पोखाली दबलेली होते. तिथे जमलेल्या लोकांनी तो टेम्पो बाजूला करण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरीस एका जेसीबीसारख्या यंत्राच्या मदतीने तो टेम्पो बाहेर काढावा लागला.”

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा