• Sun. Jun 7th, 2026

    Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडकडे जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास होणार अधिक सुलभ; दादर येथे बससेवेचा शुभारंभ

    Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडकडे जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास होणार अधिक सुलभ; दादर येथे बससेवेचा शुभारंभ

    किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी केली जात आहे. राज्यासह देशभरातून शिवप्रेमी इथे दाखल होतात. या शिवप्रेमींचा प्रवास अधिक सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. शिवप्रेमींसाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : दुर्गराज रायगड हे हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे तेजस्वी प्रतीक मानले जाते. मराठी माणसाच्या अस्मिता, स्वाभिमान आणि इतिहासाशी रायगडाचे अतूट नाते आहे. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासातील अनेक सुवर्णक्षणांचा साक्षीदार असलेला रायगड आजही लाखो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.

    यंदा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, २७ जून २०२६ रोजी तिथीनुसार दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने रायगडावर दाखल होतात. त्यामुळे वाहतूक आणि प्रवासाच्या सुविधांना विशेष महत्त्व प्राप्त होते.

    या पार्श्वभूमीवर शिवभक्तांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा या उद्देशाने श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि समितीचे सदस्य दीपेश पटवर्धन यांच्या पुढाकारातून मुंबई ते सांदोशी विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे रायगडावर जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    या विशेष बससेवेचा शुभारंभ १ जून २०२६ रोजी दादर येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी, शिवभक्त आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    मुंबईहून थेट सांदोशीपर्यंत सुरू करण्यात आलेल्या या बससेवेमुळे रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेता अशा उपक्रमांमुळे भाविकांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून दुर्गराज रायगडाशी जोडलेली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार आहे.

    रायगडला नेमके कसे जाता येते?

    रायगड जिल्ह्यातील येथून रायगड किल्ल्याचे अंतर साधारणपणे २६ किमी इतके असून महाड बस स्थानकावरून किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच ‘पाचाड’ गावत किंवा रोपवे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस तसेच खासगी वाहनाची सुविधा उपलब्ध आहे.

    महाड आगारातून एसटी बस ही दररोज सकाळी ५:३० वाजल्यापासून पाचाड (रायगड पायथा) साठी स्थानिक बसेस सुटते. तिचे तिकीट दर साधारणपणे पन्नास ते साठ रुपये इतके आहे. जिजामाता यांची समाधी असलेल्या पाचाडवरून महाडसाठी शेवटची बस साधारण दुपारी ४:०० ते ५:०० च्या दरम्यान असल्याने रायगड गडावरून वेळेत येणे आवश्यक आहे. तसेच मुंबई येथून शिवभक्त हा खासगी वाहनाने गेल्यास आठशे ते हजार रुपये खर्च येत होता. मात्र या बससेवेमुळे आता वेळ आर्थिक बचत होणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा