विधान परिषदेच्या निवडणुकीचा माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने भाजपाला मोठी डोकेदुखी सहन करावी लागणार आहे. आता चौरंगी लढत या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या जागेसाठी यंदा जळगावतून मोठी चुरस बघायला मिळाली. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सर्वात आधी निवडणुकीचा शड्डू ठोकला आणि ते मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीच्या वतीने जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच रात्री भारतीय जनता पार्टीने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेनेच्या जळगावच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भुसावळचे पदाधिकारी दीपक धांडे यांनी अर्ज दाखल केला होता. यात एकूण 16 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिंदे गटाचे दीपक धांडे यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला. तर रेश्मा कुंदन काळे या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याच नाहीत. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता या विधान परिषदेचा मुकाबला हा चौरंगी लढत होणार असून भाजपला ही डोकेदुखी ठरणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये प्रवीण गंगाराम पाटील, निलेश सुरेश चौधरी, आसिफ मोहब्बत दारा मोहम्मद, सुनील निमिदास जंगले, शेख जावेद इकबाल अब्दुल रशीद, सचिन चौधरी, दीपक काशिनाथ धांडे, निलेश गणेश झोपी, कलीम खान हैदर खान मणियार, हितेंद्र देशमुख, घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील या एकूण 12 उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. तर निवडणुकीच्या मैदानात चार जण रिंगणात असल्याने निवडणुकीत चुरस वाढलेली आहे.
या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने नंदकिशोर महाजन तर महाविकास आघाडीकडून शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी आणि शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर अपक्ष रेश्मा कुंदन काळे या चौघांचे उमेदवारी अर्ज कायम असल्याने या चौघांमध्ये सामना रंगणार आहे. यात विशेषता रेश्मा काळे यांचा अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे यांची देखील उपस्थिती होती. तर रेश्मा काळे या गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने त्यांच्यासोबत सरिता माळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे देखील त्यांच्यासोबत सप्तशृंगी येथील देवीच्या दर्शनाला गेले असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका
मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव महानगरपालिकेतील नगरसेवक, पारोळा, धरणगाव या शहरातील नगरपालिका या जवळपास शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. धरणगाव येथील नगराध्यक्ष हा शिवसेना ठाकरे गटाचा निवडून आला असला तरी त्या ठिकाणी नगरसेवक बरेच शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. एकंदरीत बघता शिवसेना शिंदे गटाची बऱ्याच नगरपालिकेवरती पकड असल्याने आता शिवसेना शिंदे गट महायुतीला मतदान करणार की शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला मतदान करणार? हे पाहणे तितके महत्त्वाचे ठरेल.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा