• Thu. Sep 17th, 2026

श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्रीच्या बैठकीनंतर प्रताप चिखलीकर यांची प्रतिक्रिया

श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्रीच्या बैठकीनंतर प्रताप चिखलीकर यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची बुधवारी मध्यरात्री भेट घेतली. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त श्रीकांत शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आहेत. रात्री साडे बारा वाजता एका हॉटेलमध्ये चिखलीकर यांनी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे आणि सेनेच्या आमदारांसह त्यांनी बंद दाराआड चर्चा देखील केली. विशेष म्हणजे नांदेडची जागा भाजपसाठी सुटणार असल्याची दाट शक्यता आहे. असे असताना आमदार चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी निवडणूकीचा अर्ज घेतला आहे. याच अनुषंगाने चिखलीकर यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed