म. टा. प्रतिनिधी, लोणावळा: सध्या संपूर्ण देशात जनगणनेचं काम सुरू आहे. याच जनगणनेच्या कामासाठी मावळातील अहिरवडे गावाकडे मोटार सायकलवरून जाणाऱ्या एका महिला प्रगणक शिक्षिकेच्या मोटारसायकलला भरधाव वेगात जाणाऱ्या एका कंटेनरने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या भीषण धडकेत जनगणना प्रगणक शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. कर्तव्याच्या मार्गावर प्रगणक शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दीपाली सुजित तांबे (वय-५०, सध्या रा. तानाजीनगर, चिंचवड, पुणे मूळ रा. मंचर, खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या जनगणना प्रगणक शिक्षेकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनगणना प्रगणक दीपाली तांबे या मावळ तालुक्यातील कान्हे जवळील अहिरवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. देशात जनगणना मोहीम सुरू आहे. या जनगणनेच्या कामासाठी दीपाली तांबे या अहिरवडे गावाला त्यांच्या मोटार सायकलवरून (एमएच-१४/ सीव्ही-८६१८) चालल्या होत्या. या दरम्यान जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथील चौकात भरधाव वेगात मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या मोटार सायकलला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी केली. त्यांच्या जवळील ओळखपत्रामुळे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी या संदर्भात तहसीलदार कार्यालय व तांबे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा