• Tue. Jun 16th, 2026

    Raigad Accident: “वाढदिवशीच देवाने तुम्हाला बोलावून घेतले”; साताऱ्यातील तरुणांसाठी मित्रांच्या स्टेट्सने डोळ्यात पाणी

    Raigad Accident: “वाढदिवशीच देवाने तुम्हाला बोलावून घेतले”; साताऱ्यातील तरुणांसाठी मित्रांच्या स्टेट्सने डोळ्यात पाणी

    सुधीर पाटील, सातारा : कोकण पर्यटनावरून परत येताना स्कार्पिओ गाडी आंबेनळी घाटातील दरीत कोसळून 8 तरूणांचा जागीच अंत झाला. या भीषण अपघातात मृत्यू झालेले सगळे एकमेकांचे जीवलग मित्र होते. महेश पवार याचा रविवारी वाढदिवस होता. मात्र, वाढदिनीच ‘बर्थे डे’ बॉयसह त्याच्या मित्रांवर नियतीने घाला घातला. आसगावातील बाकीच्या मित्रांना महेशचा वाढदिवस साजरा करायचा होता, पण काळाने सगळ्यांनाच हिरावलं. या घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी डोळ्यात पाणी आणणारा स्टेट्स ठेऊन श्रद्धांजली वाहिली आहे.

    ”वाढदिवसाच्या दिवशीच देवाने तुम्हाला आपल्याकडे बोलावून घेतले. ज्या दिवशी आनंद साजरा करायचा होता, त्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला. तुमची खूप आठवण येईल… भावपूर्ण श्रद्धांजली!” हे व्हॉट्सॲप स्टेट्स सध्या सातारा तालुक्यात व्हायरल झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आसगाव, मर्ढे आणि खटावमधील आठ जण कोकणातील हर्णे बीच परिसरात पर्यटनासाठी गेले होते. पर्यटनाचा आनंद लुटून परत येताना घात झाला आणि नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

    साताऱ्यापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावरील आसगावला आज सकाळपासूनच स्मशानकळा आली आहे. अपघाताची बातमी कळल्यानंतर अख्खं गाव सुन्न झालं आहे. विशी-पंचवीशीतील मुलांच्या मृत्यूने कुटुंबीयांच्या दु:खाला तर पारावारच उरलेला नाही. गावात सकाळपासूनच स्मशानशांतता पसरली आहे. अपघाताची दुर्दैवी घटना नातेवाईक, मित्र परिवाराला चटका लावणारी आहे.

    आसगावातील सगळ्यांनाच या घटनेने धक्का बसला आहे. अपघातानंतर दरीतून मृतदेह वर काढण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन आणि प्रशासकीय कार्यवाहीनंतर सायंकाळपर्यंत सर्व मृतदेह आसगाव, मर्ढे आणि खटावला पोहोचतील. रात्री मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

    दरम्यान, आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले असून दोघांचीही ओळख पटली आहे. आणखी सहा मृतदेह दाभिळ गावात खाली जंगलात अडकले आहेत. हे मृतदेह काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासन व बचाव पथके काम करत आहेत. अद्यापही घटनास्थळी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

    मंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

    पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रायगड व सातारा जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. मन हेलावून टाकणाऱ्या या अपघाताबद्दल देसाई यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तात्काळ सातारा वरायगड जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून माहिती घेतली. यावेळी त्यांनी बचावकार्य व मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed