Vidarbha Heatwave Alert: विदर्भात उष्णतेचा कहर वाढला असून वर्ध्यात ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हिटवेव्ह अलर्ट जारी करण्यात आला असून उष्माघाताच्या रुग्णांत वाढ होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : विदर्भ सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात सापडला असून तापमानाने अक्षरशः कहर माजवला आहे. वर्धा येथे बुधवारी तब्बल ४७.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण जिल्हा म्हणून वर्ध्याची नोंद झाली आहे. उपराजधानी नागपुरातही पारा ४६.६ अंशांवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पसरत असून नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्ण वाऱ्यांमुळे वातावरण अधिकच तापले असून शहरातील बाजारपेठा, चौक आणि मुख्य मार्गांवर दुपारच्या सुमारास कर्फ्यूसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार
अकोला – ४५.२ डिग्री
अमरावती – ४६.४ डिग्री
भंडारा – ४४.६ डिग्री
बुलढाणा – ४१.० डिग्री
चंद्रपुर – ४६.२ डिग्री
गढ़चिरौली – ४५.६ डिग्री
गोंदिया – ४४.९ डिग्री
नागपुर – ४४.६ डिग्री
वर्धा – ४७.१ डिग्री
वाशिम – ४२.६ डिग्री
यवतमाल – ४५.२ डिग्री
Land Record Department: जमीन मोजणी, गावठाण नोंदी, नगर भूमापनासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 50 नवी कार्यालयं, 10 हजार पदांवरही मोहर
दरम्यान, वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवरही दिसून येत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलट्या, अशक्तपणा आणि थकवा अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणारे मजूर यांना सर्वाधिक फटका बसत आहे. डॉक्टरांकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.
हवामान विभागाने पुढील आठवडाभर विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचे, हलके व सैल कपडे वापरण्याचे आणि उष्णतेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा