• Sun. Jun 14th, 2026
    Pramod Jathar: मोदींसाठी काय पण! म्हणाले तर समुद्रात उडी मारु, PM एका रात्रीत काहीही बंद करु शकतात; भाजप आमदाराचं वक्तव्य

    Pramod jathar: भाजप आमदार प्रमोद जठार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत “मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी मारू” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती आणि निर्णयक्षमतेवर विश्वास व्यक्त करत भाजप नेते आणि आमदार प्रमोद जठार यांनी केलेले एक वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, “मोदीजी कोणत्याही रात्री काहीही बंद करू शकतात,” असे म्हटले आहे. तसेच “मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू,” असे वक्तव्यही त्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

    नेमकं काय म्हणाले आमदार जठार?

    आमदार जठार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “आमचा नेता मजबूत आहे, देशातील सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा आणि ते जे सांगतील ते ऐका,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

    जठारांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया

    दरम्यान, जठार यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांवरून चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांकडून या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: CM फडणवीसांचा कडक निर्णय, तुकाराम मुंढेंकडे आता FDAची धुरा; प्रशासनात आणखी कोणते बदल?

    प्रमोद जठार यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर

    प्रमोद जठार हे भाजपचे नेते सातत्याने ते पक्षात कार्यरत आहेत. नुकतेच ते भाजपकडून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. कोकणातील भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. 2009 मध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी पराभव केला होता.

    औद्यागिक प्रकल्पांबाबत स्पष्ट भूमिकेसाठीही ओळख

    त्यानंतर त्यांनी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. पक्ष संघटनेत त्यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. कोकणातील नाणार रिफायनरीसारख्या औद्योगिक प्रकल्पांबाबत त्यांनी यापूर्वीही स्पष्ट भूमिका मांडली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा