Maharashtra Government: विश्वास नांगरे पाटील यांनी सरकारवर टीका केल्याचं भासवत सोशल मीडियावर एक ग्राफिक्स व्हायरल केलं जात आहे. याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे.
विश्वास नांगरे पाटलांच्या नावाने व्हायरल होणारी पोस्ट फेक, DGIPR कडून खुलासा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे जसे अनेक फायदे आहेत तसे काही तोटेही पाहायला मिळतात. एआयमुळे एखादा बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवणे सोपे झाले असल्याने सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटण्यास मदत होत आहे. असाच एक फोटो सध्या राज्यात प्रचंड व्हायरल होत असून यामध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे नाव आणि फोटो वापरून खोटी माहिती प्रसारित करण्यात आली आहे. नांगरे पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून सरकारवर निशाणा साधल्याचं या व्हायरल फोटोतून भासवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात मात्र नांगरे पाटील यांनी असे कोणतेही वक्तव्य केलं नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संबंधित व्हायरल होत असलेल्या फोटोवर महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने खुलासा करत नांगरे पाटील यांनी असे वक्तव्य केलं असल्याचं सांगितलं आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) म्हटलं आहे की, “भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली असं म्हणत IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यवस्थेवर भाष्य केल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या कोणत्याही भाषणात किंवा मुलाखतीत असे वक्तव्य केल्याचे आढळत नाही. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे,” असा दावा डीजीआयपीआरकडून करण्यात आला आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये अप्रत्यक्षपणे सरकारवर टीका करण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “भाकरी करपली. आचारी म्हणाला, तवा बदला! भाकरी पुन्हा करपली. आचारी म्हणाला, पीठ बदला! भाकरी तरीही करपलीच. आचारी म्हणाला, पाणी बदला ! पुन्हा तेच… भाकरी पुन्हा करपलीच. आचारी म्हणाला, चूल बदला! तरीदेखील परिणाम शून्यच. भाकरी करपतच राहिली. पण एकाची देखील आचारी बदला, असं म्हणण्याची हिंमत झाली नाही! हीच स्थिती सध्या देशाची झाली आहे,” अशा मजकुराच्या खाली विश्वास नांगरे पाटील यांचे नाव लिहून सोबत त्यांचा फोटोही वापरण्यात आला होता.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडूनच याबाबतचा खुलासा करण्यात आला असून ही पोस्ट खोटी असल्याचं स्पष्ट करण्यात आल्याने अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा