Pune News : नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने स्थानिक पातळीवर भाजपचे पारडे जड मानले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांतील दिग्गज उमेदवारीसाठी सज्ज आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर केल्यामुळे पुण्यात राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. माजी आमदार अनिल भोसले यांची २०२२ पासून रिक्त राहिलेली पुण्याची ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी दिवंगत नेते अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात भारतीय जनता पक्षानेही या जागेवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केल्याने महायुतीतच ‘पुण्याच्या जागेवरून’ मिठाचा खडा पडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
महायुतीत अंतर्गत सामना
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर मतदारांचे संख्याबळ पूर्ण झाल्याने आयोगाने अखेर १८ जून रोजी मतदानाचा बिगुल वाजवला. या जागेवरून आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सामन्याऐवजी महायुतीत अंतर्गत सामना रंगण्याची जास्त चर्चा आहे. Twisha Sharma Case : मी अडकले, तू सांभाळून राहा; Ex मिस पुणेचा रात्री मैत्रिणीला मेसेज, पण सकाळ उगवलीच नाही; पतीसह निवृत्त न्यायाधीश सासूवर गंभीर आरोप या मतदारसंघात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य; तसेच पंचायत समिती सदस्य असे मुख्य मतदार असतात. नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने स्थानिक पातळीवर भाजपचे पारडे जड मानले जात असल्याने दोन्ही पक्षांतील दिग्गज उमेदवारीसाठी सज्ज आहेत.
अजितदादांची राष्ट्रवादी गिळंकृत करण्याचा डाव, उमेश पाटील यांचा रोहित पवारांवर घाणाघात
‘बीडकर की मुळीक?’
महापालिकेत दीर्घ अनुभव असलेले गणेश बीडकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांवर आणि स्थानिक गणितांवर त्यांची मजबूत पकड असल्याने ते उमेदवारीसाठी मुख्य दावेदार आहेत. माजी आमदार जगदीश मुळीकही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांना विधान परिषदेचे आश्वासन दिले होते. ते पाळले जावे, यासाठी त्यांनी पक्षनेत्यांना साकडे घातले आहे.
जागा राखण्याचे आव्हान
माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर योगेश बहल, माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आणि खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. Air India Crash : कॅप्टन सभरवालांनी प्राण सोडलेले, पण मुठीत हँडलची घट्ट पकड, शवागरात बॉडी पाहिलेल्या तरुणाने सांगितलं हादरवणारं दृश्य
भाजपचे संख्याबळ वाढले
महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाला सोडायची, की भाजपने स्वतःकडे घ्यायची, यावरून वरिष्ठ पातळीवर मोठी रस्सीखेच होणार आहे. अनिल भोसले निवडून आले, तेव्हा ही अखंड राष्ट्रवादी होती. मात्र, आता अजित पवार महायुतीत आहेत. त्यातच पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवून चांगले संख्याबळ मिळवले आहे. या संख्याबळाचा विचार करता भाजप आणि ‘राष्ट्रवादी’चे मतदार समसमान आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे पहिलाच पेचप्रचंग उपस्थित होणार आहे. अजित पवार हयात असते, तर कदाचित हा प्रश्न उपस्थित झाला नसता.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा