Ola, Uber, Rapido Removed: महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने शुक्रवारी अॅपल आणि गुगलला नोटिसा बजावल्या असून त्यांनी ओला, उबर आणि रॅपिडो या अॅपविरुद्ध नोटीस बजावून ते काढण्याचे आदेश दिले होते. पण एकाच दिवसांत, म्हणजे शनिवारपर्यंत हा निर्णय रद्द करण्यात आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महामुंबईसह राज्यभरात बेकायदा सुरू असलेल्या बाइक टॅक्सीला लगाम घालण्यासाठी ही सेवा देणारे ॲपच ‘गुगल’ आणि ‘ॲपल ॲप स्टोअर’वरून हटवण्याचे आदेश काढण्यात आले, मात्र ओला, उबर, रॅपिडोच्या सगळ्या सेवा एकाच ॲपमध्ये असल्याने त्यांची संपूर्ण वाहतूक देशभरात कोलमडली.
24 तासांत सेवा सुरळीत
या कंपन्यांनी याबाबत लागलीच मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि २४ तासांत महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाने सुधारित आदेश काढून सर्व ॲप आधारित वाहतूक सेवा सुरळीत केल्या. मुंबईसह राज्यात अनधिकृत बाइक टॅक्सीचे पेव फुटले आहे. राज्य सरकारचे सुरक्षा नियम डावलून सुरू असलेली बाइक टॅक्सी बंद करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य पोलिसांच्या अप्पर महासंचालकांना (सायबर गुन्हे) पत्र पाठवले. मंत्र्यांचे पत्र आणि मोटार वाहन कायद्याचा संदर्भ देऊन सायबर गुन्हे विभागाने ‘प्ले स्टोअर’ आणि ‘ॲपल ॲप स्टोअर’वरून बाइक टॅक्सी सेवा हटवण्याची सूचना केली.
India’s First Bullet Train: फक्त 2 तासांत मुंबई ते अहमदाबाद, 320चा वेग, महाराष्ट्रात 4 थांबे; भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर
ओला आणि रॅपिडो कंपनीच्या एकाच ॲपमध्ये रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहन, बाइक टॅक्सी यांसह पार्सल सेवाही आहे. उबरच्या ॲपमध्ये या सुविधांसह मेट्रो तिकीट आणि बस तिकीट खरेदी करण्याचीही सुविधा आहे. बाइक टॅक्सीसाठी स्वतंत्र ॲप नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, गुगल आणि ॲपल मुख्यालयाने हे ॲप तातडीने हटवण्याची कारवाई केली. शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजल्यापासून काही तास या कंपन्यांची सेवा खंडित झाली. दिवसांच्या तुलनेत मध्यरात्री ॲप आधारित वाहतुकीचा वापर कमी होतो.
त्यामुळे तुलनेने कमी गोंधळ कमी झाला. महाराष्ट्रातील सायबर विभागाच्या पत्रानुसार ही कारवाई झाल्याने कंपन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मुख्यमंत्री कार्यालयाने सर्व प्रकार जाणून घेतला. त्यानंतर संबंधित प्रशासनाला सुधारित पत्र पाठवण्याच्या सूचना केल्या. राज्य सरकारने केवळ ई-बाइक टॅक्सीतून प्रवासी वाहतुकीला मुभा दिली आहे. पेट्रोलवर धावणाऱ्या बाइक टॅक्सीला अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही.
शुक्रवारी मध्यरात्री ओला, उबर, रॅपिडोची देशात सेवाच बंद.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांना फटका बसल्याने गोंधळ.
मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर प्रकार लक्षात आला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा