• Sun. Jun 7th, 2026
    जलील यांची मनपा आयुक्तांना तक्रार, भाजप नगरसेवकांनी स्वतःच अतिक्रमित बांधकाम पाडलं

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात करण्यात आली. मतीन पटेल यांचे घर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत पाडल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. MIM चे नेते इम्तियाज जलील यांनी आरोप केला होता की भाजपचे नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी देखील अनधिकृत बांधकाम केलं असून याबाबतची माहिती मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे. जशी आमच्या नगरसेवकांच्या घर आणि कार्यालयावर कारवाई करण्यात आली तसेच कारवाई सत्ताधारी नगरसेवकांच्या मालमत्तांवर करण्यात यावी अशी मागणी जलील यांनी लावून धरली होती. दरम्यान, भाजपच्या या दोन्ही नगरसेवकांनी स्वतःहून आपल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed