Missing Link Network: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे प्रवास सोपा झाला असला तरीपण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी नेटवर्क नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: मुंबई-पुणे मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर कमी झालं आहे. मे महिन्यात सुरू झालेल्या या मार्गामुळे घाटातील वाहतूक कोंडी फुटली असून अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. पण मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे. बोगद्यांच्या आतमध्ये गाडी गेल्यानंतर मोबाइलमध्ये नेटवर्क जातो. त्यामुळे अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत धोका निर्माण होऊ शकतो.
जगातील सर्वात लांब पल्ल्याचा बोगदा
1 मे रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितित मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं लोकार्पण झालं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गाचं बांधकाम करण्यात आलं होतं. या 13 किलोमीटर लांब मार्गावर 2 बोगदे आहेत दोघांमध्ये दोन केबल-स्टेड पूल आहेत. या दोन बोगद्यांपैकी पुण्याचकडील बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. यापूर्वी, मुंबई ते पुणे महामार्गावरून घाटातून प्रवास करताना 19 किलोमीटर अंतर पार करावं लागतं. पण आता हे अंतर 13 किमी वर आलं आहे. त्यामुळे प्रवासात 20 ते 25 मिनिटे वेळ वाचतो आहे. लोणावळा-खंडाळा घाटातील खडतर प्रवासापासून प्रवाशांची सुटका होणार आहे.Pen-Panvel Local Train: पेण तालुक्यात ‘तिसरी मुंबई’; तरी थेट पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षाच, हजारो प्रवाशांचे दररोज हाल
अनेक वाहनचालकांनी मिसिंग लिंकवरील बोगद्यामध्ये गेल्यावर कमकुवत नेटवर्क येत असल्याची तक्रार केली. अनेक वाहनचालकांनी नेटवर्क पूर्णपणे जात असल्याची तक्रार केली. त्यामुळे बोगद्यामध्ये वाहन बंद पडले किंवा काही अपघात झाला तर अशा वेळी बाहेरून मदत मागवणं कठीण होणार आहे. बोगद्यातून प्रवास करताना 8 ते 10 मिनिटांचा वेळ जातो. त्यामुळे या वेळेत पूर्णपणे नेटवर्क गायब होते.
बोगद्यामध्ये नेटवर्क का येत नाही?
मिसिंग लिंकवर सह्याद्री डोंगरावरील अतिशय कठीण अशा खडकांतून हे बोगदे तयार करण्यात आले आहेत. डोंगराच्यामध्ये टायगर व्हॅलीमध्ये बांधलेल्या पुलांना हे बोगदे जोडतात. या डोंगरावरती बसवलेल्या नेहमीच्या टॉवरचा नेटवर्क या कठीण खडकांमधून आतमध्ये पोहोचू शकत नाही. त्यामुळे बोगद्यांच्या आतमध्ये प्रवेश करताच नेटवर्कच्या समस्या सुरू होतात.
Vidarbha Highways: विदर्भातील प्रवास सुस्साट होणार! 547 किमी लांबीच्या चार महामार्गांना मंजुरी; कसे-कुठे असतील मार्ग?
नेटवर्क कसा मिळू शकतो?
बोगद्यांच्या भींतींवरून एका विशेष प्रकारच्या लिकी फिडर केबल्स टाकून नेटवर्क मिळू शकते. हे केबल अँटेनासारखे काम करतात आणि त्यामुळे संपूर्ण बोगद्यामध्ये 4G/5G नेटवर्क पोहोचू शकतं. दुसरी एक प्रणाली म्हणचे ‘डिस्ट्रिब्युटेड अँटेना सिस्टम’ (DAS) द्वारे बोगद्यांमध्ये ठराविक अंतरावर लहान-लहान अँटेना आणि फायबर केबल्सचे जाळे बसवले जाते. या जाळ्यांद्वारे बोगद्यांच्या बाहेरील नेटवर्क आतमध्ये खेचला जातो.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा