• Fri. Jul 3rd, 2026

    फाउंटन येथील परिवहन आयुक्त कार्यालय आता वांद्रे (पूर्व) येथे स्थलांतरित – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 11, 2026
    फाउंटन येथील परिवहन आयुक्त कार्यालय आता वांद्रे (पूर्व) येथे स्थलांतरित – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : मोटार वाहन विभागाचे मुख्यालय असलेले परिवहन आयुक्त कार्यालय फाउंटन येथून प्रशासकीय इमारत, ४ था मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. यापूर्वी परिवहन आयुक्त कार्यालय हे ५ वा मजला, टेलिकॉम बिल्डिंग क्रमांक २, महात्मा गांधी रोड, फाउंटन, मुंबई – ४०० ००१ येथे कार्यरत होते. आता हे कार्यालय प्रशासकीय इमारत, ४ था मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ येथे स्थलांतरित झाले आहे.

    या नवीन कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२०८६३४०६ असून ई-मेल आयडी [email protected] असा आहे. सर्व नागरिकांनी कार्यालयाच्या पत्त्यात झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक परिवहन आयुक्त (निरीक्षण) कैलास कोठावदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *