• Fri. Jul 3rd, 2026

    पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वाघापूर टेकडी येथे क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृहाचे भूमिपूजन व पायाभरणी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 8, 2026
    पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वाघापूर टेकडी येथे क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृहाचे भूमिपूजन व पायाभरणी – महासंवाद

    यवतमाळ, दि. ८ : नगरपरिषद यवतमाळ मार्फत वाघापूर टेकडी येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृह बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करुन पायाभरणी काल करण्यात आली. क्रांतीविर शामादादा कोलाम सभागृह हे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, उपनगराध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, मुख्याधिकारी गिरीष पालेकर, नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते.

     

    पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले की, क्रांतीविर शामादादा कोलाम यांच्या नावाने सभागृह व्हावे ही अनेक वर्षांची मागणी होती ती पूर्णत्वास आली आहे. त्यासाठी ३ कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध केला. शामादादा कोलाम यांनी कायम गरीबांसाठी काम केले, त्यांना मदत करायचे. शामादादा कोलाम हे खरे क्रांतिवीर आणि रॉबिनहूड व्यक्तीमत्व होते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

    यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी क्रांतिवीर शामादादा कोलाम यांना अभिवादन करुन शामादादा कोलाम यांनी समाजातील दीनदुबळे, गरीबांसाठी तळमळीने काम केल्याचे ते म्हणाले.

    आमदार किसन वानखेडे म्हणाले की, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा आदिवासी कोलाम समाज दुर्लक्षित राहिला होता. शामादादा कोलम यांनी या समाजाचे अस्तित्व राखले. या सभागृहाच्या माध्यमातून शामादादा कोलाम यांच्या स्मृती आणि समाजाची संस्कृती टिकवून ठेवावी, असे अपेक्षा व्यक्त केली.

    यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आदिवासी कोलाम समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, नावीण्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीसंदीप बेंडे सर यांनी केले. प्रास्ताविक श्री श्रीकांत तलवारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शैलेश गाडेकर यांनी केले.

    चौकट

    वाघाई माता मंदिराचे सौंदर्यीकरण, जीर्णोद्धार करणार. यवतमाळ शहरातील वाघापूर टेकडी येथील वाघाई माता मंदिराच्या सौंदर्यीकरण, जीर्णोद्धारासाठी निधी देण्याची घोषणा पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी या भूमिपूजन कार्यक्रमात केली.

    ००००

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed