• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai News : 12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त; मुंबई न्यायालयाचा मोठा निकाल

    Mumbai News : 12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त; मुंबई न्यायालयाचा मोठा निकाल

    Mumbai Court Verdict : मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका पोक्सो खटल्यात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुराव्यांचा अभाव आणि पीडितेच्या साक्षीत विसंगती आढळल्याने न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

    12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त; मुंबई न्यायालयाचा मोठा निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने १२ वर्षांपासून सुरू असलेल्या एका गंभीर पोक्सो (POCSO) खटल्यात आपला निकाल दिला आहे. सबळ पुराव्यांचा अभाव आणि पीडितेच्या साक्षीमध्ये आढळलेली विसंगती यामुळे न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. २०१४ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

    काय होतं प्रकरण?

    हे संपूर्ण प्रकरण २०१४ मधलं आहे. एका अल्पवयीन मुलीने काही जणांवर गंभीर आरोप केले होते. तिचं अपहरण करून अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला होता. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ हालचाली करत पोक्सो आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. हा खटला गेल्या १२ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. पीडितेने लावलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते, त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

    न्यायालयाचा निकाल आणि दोन्ही बाजू

    दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, सरकारी पक्षाने पीडितेची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेची साक्ष नोंदवताना तिच्या विधानांमध्ये आणि प्रत्यक्ष घटनाक्रमात काही महत्त्वाच्या विसंगती दिसून आल्या. यावेळी न्यायालयाने नमूद केले की, पीडितेने ज्या प्रकारे आरोप केले, त्या पुराव्यांची साखळी तपास यंत्रणांना पूर्णपणे जोडता आली नाही.

    Maharashtra TimesAmit Thackeray : ‘त्यांच्यात मुंबई बंद करण्याची ताकद नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील’; अमित ठाकरेंचं वक्तव्य; म्हणाले, ‘गावी जा…’

    कायदेशीर बाबींवर लक्ष

    न्यायालयाने स्पष्ट केले की, फौजदारी कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी ‘निसंशय पुरावा’ आवश्यक असतो. केवळ आरोपांच्या आधारावर शिक्षा देता येत नाही. या प्रकरणात तपासातील त्रुटी आणि साक्षीदारांच्या विधानांमधील तफावत यामुळे संशयाचा फायदा आरोपींना मिळाला.

    १२ वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता

    या खटल्यामुळे आरोपींना १२ वर्षे कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे पीडितेच्या आरोपांचीही प्रदीर्घ चौकशी झाली. अखेर, कायद्याच्या चौकटीत आरोपींवरील दोष सिद्ध होऊ न शकल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. या निकालानंतर गुन्हेगारी प्रकरणांमधील तपास आणि पुराव्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा