शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कोण होता शिवाजी? पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करुन शिवीगाळ आणि धमकी दिली आहे. त्यांची फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवर संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते ‘कोण होता शिवाजी?’ पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी आणि अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. पुस्तकाचं नाव एकरी असल्याचे कारण देत संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावर तोंडसुख घेतलं. त्यांनी अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरुन प्रशांत आंबी यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. त्यांच्या भाषेबद्दल सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. या प्रकरणावरुन राजकारण तापल्यानंतर संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याला प्रशांत आंबी यांनी डिवचल्यामुळे आपण त्यांना शिवीगाळ केल्याचा त्यांचा दावा आहे. पण ऑडिओ क्लिपनुसार प्रशांत आंबी हे अत्यंत शांत, संयम आणि विनम्रपणे संजय गायकवाड यांचा प्रतिकार करताना दिसले आहेत.
संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण काय?
“एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या ऑडिओ क्लिपला मोडूनतोडून, त्यामधील काही शब्द वगळून काही शब्द ठेवून व्हायरल करण्यात आले. माझ्या पत्नीला 21 तारखेला एका कार्यक्रमात कुणीतरी शिवाजी कोण होता? हे पुस्तक गिफ्ट दिलं. मी हे पुस्तक वाचलं. हे वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे. त्या इतिहासाली छेडछाड करुन प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता? शिवाजी महाराज क्षत्रिय होते की नव्हते? मराठा होते की नव्हते? अशा प्रकारचे अनेक बेछुट प्रश्न उच्चारलेले आहेत. त्यामुळे त्याला मी फोन केला”, असं संजय गायकवाड म्हणाले.”फोन केल्यानंतर त्याला मी म्हटलं की, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे का? तो म्हणाला, मी प्रकाशन केलं आहे. मी म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता? हे का लिहिलं? ते म्हणाले, पुस्तक फार जुनं आहे. अमूक-अमूकने ते पुस्तक लिहिलं आहे. ते कोणीही लिहू दे. पण प्रकाशन कुणी केलंय? प्रकाशन करताना तुम्ही पुस्तकाच्या नावाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज का केला नाही?”, असं गायकवाड म्हणाले.
“शिवाजी महाराजांची वारंवार महाराष्ट्रात विटंबना केली जाते. बोलता-बोलता तो म्हणाला की, मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही मला असं बोलताय. मी त्याला म्हटलं, तू ब्राह्मण आहेस का? असा प्रश्न विचारला का? तो म्हणे, गोविंद पानसरे. मी म्हटलं, मला काय म्हणायचं आहे गोविंद पानसरे यांच्याशी. ते वर गेले, जा तिकडे तू. या पद्धतीने त्याने मुजोरी ठेवली. मला त्याला विचारत असताना त्याने डिवचलं त्यामुळे मी त्याला शिवीगाळ केली. त्याला मी जीभ हासळायची असं म्हटलं. शंभर टक्के अशा माणसाची जीभ हासळलीच पाहिजे. आम्ही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करु शकत. अशी पुस्तकं नष्ट केली पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
प्रकाशक प्रकाश आंबी काय म्हणाले?
दरम्यान, शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांनी या ऑडिओ क्लिपवर आता प्रतिक्रिया दिली आहे. 2017 पासून प्रशांत आंबी हे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशन करतात. या पुस्तकाचे एकूण तीन प्रकाशक आहेत. त्यापैकी एक संघर्षा प्रकाशन आहे. या संघर्षा प्रकाशनचे प्रकाशक प्रशांत आंबी आहेत. “शिवाजी कोण होता? या पुस्तक प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली. त्यांनी मध्यरात्री फोन करून धमकी आणि शिवीगाळ केली. गायकवाड यांनी हा त्यांचाच आवाज असल्याचं कबूल केलं आहे”, असं प्रशांत आंबी म्हणाले.
“विकृत मानसिकतेच्या आमदारावर आज गुन्हा दाखल करणार आहे”, असं प्रकाश आंबी म्हणाले आहेत. तर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरेंनी स्पष्ट केलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी ‘एकीकडे महायुती सरकार महिलांसाठी योजना आणत आहे आणि दुसरीकडे याच सरकारमधील सत्तेतील आमदार अशी भाषा वापरत आहेत. ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा संजय गायकवाडांवर निशाणा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. “बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीन मधे हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
“राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघीतली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे”, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
“पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरे चे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत या आमदाराचा देखील सहभाग आहे का, याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
दीपक केदार यांची संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी
राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दिपक केदार यांनी संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी केली आहे. “संजय गायकवाडला तात्काळ अटक करा. गृहमंत्री यांनी उत्तर द्यावं. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कोण करतंय? बुलढाणाच्या कमानी गडाच्या नावाने आणि आत शहरात दारू विक्री, बिअरबार विक्री, कोण करतंय अवमान? शिवाजी कोल्हापूर विद्यापीठ हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ का केलं नाही? सत्ता तुमची असताना गप्प का? चिंदम, कोरटकर, कोशियरी यांच्यावर का बोलले नाही? प्रकाशकांच्या केसाला जरी धक्का लागला तर महागात पडेल, त्याला पोलीस संरक्षण देऊन तातडीने धमकी देणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करून अटक करावी”, अशी भूमिका दीपक केदार यांनी मांडली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा