• Sat. Jun 13th, 2026

    Crime News: आयटी एक्सपर्ट असल्याचं भासवलं, गुगल मीटवर महाराष्ट्रातील तरुणीशी लग्न केलं अन् हैदराबादमध्ये हॉटेलमध्ये नेत अत्याचार

    Crime News: आयटी एक्सपर्ट असल्याचं भासवलं, गुगल मीटवर महाराष्ट्रातील तरुणीशी लग्न केलं अन् हैदराबादमध्ये हॉटेलमध्ये नेत अत्याचार

    Fraud Case: न्यायालयाने आरोपीची परवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    आयटी एक्सपर्ट असल्याचं भासवलं, गुगल मीटवर महाराष्ट्रातील तरुणीशी लग्न केलं अन् हैदराबादमध्ये हॉटेलमध्ये नेत अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर: डिजिटल युगात फसवणुकीचे नवनवे मार्ग समोर येत असून, शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीला ऑनलाईन निकाहच्या जाळ्यात ओढून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला कोडिंग एक्सपर्ट आणि आयटी व्यावसायिक भासवणाऱ्या एका नराधमाने २१ वर्षीय एमसीए विद्यार्थिनीची केवळ फसवणूकच केली नाही, तर तिला हैद्राबादला नेऊन नरकयातना दिल्या.

    या प्रकरणातील पीडित तरुणी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील असून आरोपी शेख अब्दुल रहमान अहमद याची ओळख एका सेमिनार दरम्यान झाली होती. आरोपीने आपण मोठे आयटी एक्सपर्ट असून परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊ शकतो, असे आमिष पीडितेली दाखवले. यातूनच त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला आणि तिच्या घरी जाऊन लग्नाचा प्रस्ताव मांडला. पालकांची संमती मिळवल्यानंतर त्याने लग्नाचे नाटक रचले. ऑक्टोबर २०२५ मध्ये आरोपीने चक्क गुगल मीटच्या माध्यमातून एका काजीला ऑनलाईन घेऊन निकाह केल्याचा बनाव रचला. १५ लाख रुपयांचा मेहेर ठरवून त्याने हा निकाह अधिकृत असल्याचे पीडितेला भासवले. मात्र, प्रत्यक्षात हा केवळ फसवणुकीचा भाग होता.

    हैद्राबादमध्ये ९ दिवस अत्याचार….
    निकाह झाल्याचे सांगून आरोपीने पीडितेला हैद्राबादला नेले. तिथल्या एका हॉटेलमध्ये त्याने तिला सलग नऊ दिवस डांबून ठेवले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. या त्रासामुळे पीडितेची प्रकृती कमालीची खालावली. जेव्हा ती शहरात परतली, तेव्हा आरोपीच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला मान्यता देण्यास नकार देत तिला घराबाहेर काढले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शेख अब्दुलला अटक केली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा