• Wed. Jun 17th, 2026

    सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 17, 2026
    सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी – महासंवाद


    नागपूर,दि. 16 : भारतीय हवामान विभागाने दिनांक १८ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, नागपूर जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस यांना १८ एप्रिल (शनिवार) रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

    सध्या जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed