Nashik TCS SIT Investigation : नाशिक टीसीएस प्रकरणात फरार एचआर निदा खानसह इतर आरोपींना पगाराव्यतिरिक्त बाहेरून पैसे मिळत होते का? यादृष्टीने ‘एसआयटी’ने चौकशी सुरू केली आहे. यामागे एखादे मोठे रॅकेट असल्याच्या शक्यतेतूनही तपास करण्यात येत आहे.
टीसीएस धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या बँक खात्यांची चौकशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक: नाशकातल्या’टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस’मधील धक्कादायक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास आता आर्थिक व्यवहारांपर्यंत पोहोचला आहे. फरार एचआर अधिकारी निदा खानसह अटकेतील सातही आरोपींना पगाराव्यतिरिक्त बाहेरून किंवा परदेशातून कुणी रसद पुरवत होतं का, याचा शोध एसआयटीने सुरू केला आहे. आरोपींच्या बँक खात्यांतून यामागे एखादं मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून, निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणाचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
बँक खात्यांतून उलगडणार नवे धागे दोरे?
या प्रकरणी आता पोलिसांनी बँकांकडून सर्व आरोपींच्या बँक खात्यांची माहिती मागवली आहे. आरोपींना देशाच्या बाहेरून कुठून काही आर्थिक रसद पुरवली जात होती का, त्या अनुशंगाने आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. जर या लोकांच्या खात्यात पगारापेक्षा खूप जास्त पैसे सापडले, तर यामागे एखादं मोठं रॅकेट असण्याची शक्यता असल्याचा पोलिसांना संशय आहे.
निदा खान अजूनही फरार
या पूर्ण प्रकरणात एचआर मास्टरमाईंड निदा खानचं नाव वारंवार समोर येत आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने केवळ आरोपींना या गुन्ह्यांमध्ये साथ दिली नाही तर पीडित महिलांना गप्प राहण्यासाठी दबावही टाकला. निदा अजूनही पोलिसांना सापडलेली नाही. ती पकडली गेल्यानंतरच या प्रकरणाचे अनेक धागेदोरे हाती लागणार आहेत.
CBSE 10th Results : CBSE दहावीच्या निकालात पुण्याचा जलवा! देशात सातव्या स्थानी; मुर्तजा, निहार अन् ऋषभनं 99 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले
प्रकरणात आतापर्यंत कोणाला अटक?
आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ७ जणांना अटक केली आहे. कंपनीनेही त्यांना कामावरून काढून टाकलं आहे. यामध्ये दानिश शेख, तौसीफ अटार, रझा मेमन अशा लोकांचा समावेश आहे. या आरोपींनी महिलांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे बोलणे, त्यांच्यावर अत्याचाक करणे आणि त्यांना जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्याचे गंभीर आरोप आहेत. हेच लोक त्यांना व्हाट्स अॅप ग्रुपमध्येही वारंवार त्रास देत असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
टाटा कंपनीकडून कडक पावलं
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष समिती नेमली आहे. नाशिक पोलीस आता या प्रकरणाचा मुळापासून तपास करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा