• Fri. Jun 5th, 2026
    नाशिकच्या TCS मधील प्रकार वेदनादायी; लैंगिक छळाची टाटा सन्सकडून दखल, COO च्या नेतृत्वात चौकशी

    Nashik TCS News : नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कार्यालयात आठ महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचा लैंगिक छळ झाल्याचा आणि सक्तीने धर्मांतर केले गेल्याचा आरोप केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक प्रकल्पातील लैंगिक छळ प्रकरणाची टाटा सन्सने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात माध्यमांना दिलेल्या निवेदनात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी टीसीएसच्या नाशिक शाखेतील लैंगिक छळाच्या आरोपांना ‘अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी’ म्हटले आहे.

    सीओओच्या नेतृत्वात सखोल चौकशी

    नाशिक येथील या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयात आठ महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचा लैंगिक छळ झाल्याचा आणि सक्तीने धर्मांतर केले गेल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी आणि यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी सुरू असल्याचेही चंद्रशेखरन यांनी जाहीर केले.या विषयी बोलताना चंद्रशेखरन म्हणाले, ‘या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असून, कंपनी सुरू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करीत आहे.‘
    Maharashtra TimesMumbai Crime : गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचा ओव्हरडोस, मुंबईतील दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जणांना अटक

    दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई

    टाटा समूहाच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या किंवा गैरवर्तणुकीबाबत ‘झिरो-टॉलरन्स’ धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल आणि आवश्यकतेनुसार प्रक्रियेत सुधारणा किंवा इतर दुरुस्तीचे उपाय त्वरित लागू करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

    या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या महिला एचआर व्यवस्थापकासह सात जणांना अटक केली आहे. छळाच्या प्रकाराबाबत कंपनीचे दीर्घकाळापासून शून्य-सहिष्णूतेचे धोरण आहे, असे सांगत कंपनीने संशयितांना निलंबित केले आहे.

    तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी, SIT कडून चौथ्या गुन्ह्यात ताबा घेतला

    २५ मार्चपासून या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद असताना ८ एप्रिलला शहर पोलिसांनी प्रकरणाचा खुलासा केला. नाशिक कार्यालयात ७४ महिला व ५१ पुरुष कार्यरत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने कंपनीत नियमितपणे ‘पंच’ करण्यासाठी जावे लागणारे आणखी दीडशे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची कामे सुरू असली तरी त्यांना हजेरी लावता येत नसल्याने त्यांच्या व्यवस्थापकांनी मुंबई किंवा पुण्यातील कार्यालयातून हजेरी पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नाशिकमधील संबंधित कर्मचारी चार दिवसांपासून मुंबई व पुणे येथील कंपनीत जात असून, तेथेच भाडेतत्त्वाच्या खोलीत मुक्काम ठोकला आहे.

    nashik crime
    नाशिक धर्मांतर प्रकरण

    साध्या वेशातील पोलिसांची हजेरी

    ‘मार्चमध्ये सलग काही दिवस साध्या वेशातील पोलिस कंपनीत येत होते. काही महिला अधिकारीदेखील वारवतांना दिसत होत्या. परंतु, तेव्हा कंपनीत काम करणाऱ्या कोणालाही संशय आला नाही. किंबहुना गुन्हे नोंदीनंतर प्रकरण उघड झाल्यावरही कंपनीचे नाव स्पष्ट नव्हते. तीन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर हे प्रकरण या कंपनीतील असल्याचे समजले’, असे कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले.
    Maharashtra TimesRatnagiri Crime : ‘हापूस ॲग्रो’च्या संचालकाने राहत्या घरी आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ, पत्नीचा काळीज पिळवटणारा आक्रोश
    मार्चमध्ये परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह काही महिला अधिकाऱ्यांनी पाळत ठेवत प्रकरणाची गोपनीय माहिती संकलित केली होती. काही महिला पोलिस या नोकरीच्या निमित्ताने तेथे अर्जही घेऊन गेल्या होत्या. त्यातून संशयितांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाल्याचे आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा