Congress Praniti Shinde: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या.
अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? प्रणिती शिंदेंचा धक्कादायक दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित महिला अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय वर्तुळातही मोठे पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांचे खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच सोलापूरमधील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक खरात याच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. “अशोक खरातसोबत अनेक मोठे नावे जोडली गेली आहेत. भविष्यात अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो,” असं भाकीत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केलं आहे. प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बाबासाहेबांचं संविधान धोक्यात; प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका
“भाजपमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचं संविधान धोक्यात आलं आहे. देशाच्या लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. संविधान टिकवणे गरजेचे झाले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवणे हीच खरी जयंती आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. “तीन दिवसांचं अधिवेशन होणार असून महिला आरक्षणाचा विधेयक पारित होणार आहे, महिला आरक्षण अगोदरच दिलेलं आहे. तीस महिन्यांनंतर सत्ताधारी पक्षाला जाग आली,” अशी टीकाही प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली आहे.
ईडीकडून अशोक खरात याची अलिशान कार जप्त
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित महिला अत्याचार प्रकरणात विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी सुरू असताना आर्थिक गैर व्यवहाराचा देखील सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. काल सकाळी ६ वाजल्यापासून ईडीकडून भोंदू अशोक खरात याच्या तृप्तबाला बंगल्यात झाडाझडती सुरू आहे. खरात याने मिळवलेल्या बेनामी संपत्तीच्या प्रकरणी ईडीकडून सखोल तपास सुरू आहे. ईडी आणि एसआयटीकडून संयुक्तरीत्या कारवाई सुरू असून ईडीने खरात याला दणका देत त्याची आलिशान कार जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने अशोक खरात याची अलिशान एम.एच. १५ जी. एल.८१८१ या क्रमांकाची मर्सिडीज कार जप्त केली. त्यामुळे आता खरात याच्याभोवती ईडीकडून कारवाईचा फास आवळला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा