• Sun. Jul 5th, 2026

    पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली – कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 12, 2026
    पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली – कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

    मुंबई, दि.12:  आशाताईंच्या सुरांनीच संगीतविश्व अधिक व्यापक, अधिक समृद्ध केलं, हेच म्हणणं अधिक योग्य ठरेल, अशा शब्दात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शोक भावना व्यक्त केली आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    त्यांच्या आवाजात कोमलता होती, ताकद होती आणि काळानुसार बदलत राहण्याची विलक्षण क्षमता होती. भक्तिगीतांपासून गझलपर्यंत, भावगीतांपासून आधुनिक गाण्यांपर्यंत प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

    आपल्या आयुष्यातील असंख्य क्षण त्यांच्या स्वरांशी जोडले गेले आहेत. आज त्या आपल्यात नाहीत… पण त्यांचा स्वर सदैव आपल्या सोबत राहील.

    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना करत मंगलप्रभात लोढा यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    ****

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed