बारामती पोटनिवडणुकीत आता ट्विस्ट आला आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी 6 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतली आहे. तर काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम आहे. तसेच उमेदवारी मागे घेण्याबाबतच्या चर्चांवर काँग्रेसने भूमिका देखील मांडली आहे. पण 6 अपक्षांनी आज माघार घेतल्याने या निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली भूमिका ठाम करत उमेदवाराच्या माध्यमातून थेट लढतीचे संकेत दिले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या भोवती ही निवडणूक केंद्रीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ५३ वरून ४७ वर आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वी 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते. मात्र, आज विलास बाबुराव होळकर, माऊली जमादार कांबळे, रझाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, राहुल बाळासो थोरात, अमोल यशवंत कोकरे आणि अशोक रामचंद्र खामगळ यांनी आपले अर्ज मागे घेतले. हे सर्व उमेदवार अपक्ष असल्याची माहिती आहे. उर्वरित उमेदवारांमध्येही काही जण माघार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र उद्या दुपारपर्यंत समोर येण्याची अपेक्षा आहे. Baramati By-Election : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, काँग्रेसने बारामतीत उमेदवार देण्याचे राजकीय गणित काय? दरम्यान, या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या उमेदवारामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात थेट सामना उभा राहण्याची चिन्हे आहेत. बारामतीसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असल्याने ही लढत अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान उभे केलेले उमेदवार आकाश मोरे हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात 4013 मते मिळवली होती. त्यानंतर मात्र काँग्रेस बारामतीमध्ये कुठेच दिसली नाही.
12 वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमध्ये आपली ताकद आजमावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक ताकद कितपत प्रभावी ठरते, याकडेही लक्ष लागले आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात असली तरी आता ती पूर्णतः मावळली आहे. बारामतीत चुरशीची आणि बहुपक्षीय लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा