Bhimashankar Temple Closed Till 31 May: भाविकांनी; तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.
पुढील वर्षी नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, ‘प्रयागराज महाकुंभ २०२५’च्या अनुभवाच्या आधारे त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या प्रमाणात भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सुरू आहेत. सध्याचे जुने सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार आहे. त्यामुळे नवीन सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. पायरी मार्गाचे काम सुरू आहे.
Pune Accident: पुण्यात इंजिनिअर तरुणी ऑफिसला निघाली, पण वाटेत भरधाव टँकरने केला घात; भीषण अपघातात मृत्यू
सद्यस्थितीत मुख्य सभामंडप पूर्ण उतरवून नवीन सभामंडपाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सभामंडप बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामुग्री मंदिर परिसरात आहेत. चालू कामांचे स्वरूप, भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची संख्या विचारात घेता बांधकाम सुरू असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. मंदिर सभामंडपाचे साधारणतः ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, घुमटाचे काम प्रगतीपथावर आहे; तसेच मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेशमार्गावरील पायरीमार्गाचे काम प्रगतीत असून, प्रवेशमार्ग पूर्णतः बंद आहे.
‘श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे; त्यामुळे सद्यस्थितीत विकासकामांना गती देण्यात आलेली आहे.
Pune Crime : पुण्यात मद्यधुंद मुलाचा जन्मदात्या आईवरच जीवघेणा हल्ला, पोलिसांनाही धक्काबुक्की आणि धमक्या
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिरात सभामंडपासह अन्य विविध सोयीसुविधांची कामे सुरू आहेत. त्या कामांसाठी नऊ एप्रिलपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आले होते. आता हे काम आणखी वेगाने सुरू असून, त्यामुळे ३१ मेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
