• Thu. Jun 18th, 2026
    शाळेत जाणाऱ्या चिमुरडीला भरधाव डम्परने चिरडलं, जागीच मृत्यू, कांदिवलीकरांनी वाहतूक रोखून धरली

    Mumbai Accident news today : शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडताना भरधाव डम्परची धडक ऋतिकाला बसली. धडकेत ती डम्परखाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कांदिवली पश्चिमेला भरधाव डम्परने दिलेल्या धडकेत मंगळवारी शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ऋतिका चौहान असे मृत मुलीचे नाव असून पोलिसांनी डम्पर चालक पप्पू पटेल याला अटक केली. अपघातानंतर, संतप्त स्थानिकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

    कसा झाला अपघात?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात चारकोप नाका येथील ऑस्कर रुग्णालयाजवळ दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला. त्याच परिसरातील महापालिका शाळेत ऋतिका शिकत होती. शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडताना भरधाव डम्परची तिला धडक बसली. धडकेत ती डम्परखाली चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. तो हृदयद्रावक प्रसंग आणि ऋतिकाच्या शवाची अवस्था पाहून प्रत्यक्षदर्शी हेलावून गेले. क्षणात घटनास्थळी स्थानिक रहिवाशांचा मोठा जमाव जमला आणि आंदोलन सुरु झाले.याबाबत माहिती मिळताच, चारकोप पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रथम ऋतिकाला नजीकच्या रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आल्यावर बॉडी शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आली. अपघातास जबाबदार असलेला डम्परचालक पप्पू पटेल यास चारकोप पोलिसांनी अटक केली.

    Prajakt Tanpure यांची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं घडलं?

    स्थानिकांचं आंदोलन

    नागरिक रस्त्यावर उतरल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कांदिवली वाहतूक पोलिसांना चारकोप नाका परिसरात वाहतूक नियमनासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. पोलिसांच्या आश्वासनानंतर जमाव पांगला आणि वाहतूक सुरळीत झाली.
    Maharashtra TimesDosa Batter Death : डोशाच्या पिठामुळे चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई-वडील गंभीर, कुटुंबाचा दावा; दुकानदाराच्या उत्तराने मोठा ट्विस्ट

    पुण्यात टँकरच्या धडकेत तरुणी ठार

    दुसरीकडे, पुणे शहराजवळ वानवडी येथे वळण घेत असताना पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वार इंजिनिअर तरुणीला धडक दिल्याने ग्रेसिया डॅनियल इसा (२२) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. वानवडी पोलिसांनी टँकर चालक संतोष मौर्या (४५) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
    Maharashtra TimesHit and Run : जिथे पोलीस हरले, तिथे आई जिंकली; 18 वर्षांच्या क्षितीजचा हिट अँड रनमध्ये मृत्यू, पोलिसांनी केस बंद केली, 18 महिने माऊलीची शिकस्त, अखेर पुरावे मिळवलेच
    ग्रेसिया ही दुचाकीवरून नांदेड सिटी येथे कामाला जात असताना अपघात झाला. पुलाशेजारी वळण घेत असलेल्या टँकरचा दुचाकीला धक्का लागून ती खाली पडली. डोक्यावरून टँकरचं पुढचं चाक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा