• Tue. Jun 16th, 2026
    Beed | माझ्या परिस्थितीला वन अधिकारी जबाबदार, Khokya Bhosaleचा गंभीर आरोप

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #sureshdhas #satishbhosale #khokyabhosale #khokyabhosalgetbailचुकी नसतानाही जाणीवपूर्वक गुन्ह्यात अडकवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप एका व्यक्तीने केला आहे. संबंधितांनी खोटे व्हिडिओ तयार करून ते विविध लोकांसमोर दाखवले, तसेच काहीच न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागल्याचे त्यांनी सांगितले. मात्र न्यायव्यवस्थेने निर्दोष ठरविल्यानंतर आपण गुन्हेगार किंवा गुंड नसून गोरगरिबांचा कैवारी असल्याचे कारागृहातून निर्दोष मुक्त होऊन बाहेर आल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. याचबरोबर, आपल्या घरावर तीन वेळा हल्ले करण्यात आले असून कोंबड्या व शेळ्यांचीदेखील हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सोशल मीडियावरून आपल्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा कठोर पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed