Nashik Crime: आगामी काळात कोणत्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
अशोक खरात प्रकरणात आता दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी रडारवर?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक: नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात एका बड्या IAS अधिकाऱ्याचे नाव चर्चेत असतानाच पोलिस दलातील दोन वरिष्ठ महिला अधिकारी तपासाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक पोलिस उपआयुक्त आणि एक सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाची महिला अधिकारी खरात याच्या संपर्कात होत्या, अशी खळबळजनक माहिती समोर येते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी आपल्या आवडीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी यासाठी अशोक खरात याच्याकडे धाव घेतल्याची चर्चा असून त्या दृष्टीने तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित अधिकारी आणि खरात यांच्यात काही मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का? याचीही कसून चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तांत्रिक तपासातून या महिला अधिकाऱ्यांच्या नावांचे धागेदोरे समोर आले आहेत. जर या प्रकरणात प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांचे हितसंबंध उघड झाले, तर नाशिकसह राज्याच्या गृहविभागात मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.
महिला लैंगिक शोषण प्रकरणी आज महत्त्वाची पत्रकार परिषद
भोंदू अशोक खरातविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून आज ७ एप्रिल रोजी सायंकाळी एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत बहुचर्चित ‘खरात प्रकरणा’बाबत पोलीस प्रशासन मोठे खुलासे करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य आणि पीडितांची वाढती संख्या पाहता, याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून SIT ची स्थापना करण्यात आली होती. या पथकाकडे तपासाची सूत्रे गेल्यानंतर आतापर्यंत काय प्रगती झाली आणि खरात प्रकरणातील मुख्य संशयितांच्या विरोधात कोणते ठोस पुरावे हाती लागले आहेत, याची अधिकृत माहिती आज समोर येणार आहे.
आज सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात या प्रकरणाबाबत अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासन या पत्रकार परिषदेद्वारे कोणती तथ्ये मांडणार आणि यातील आरोपींचे धागेदोरे नेमके कुठे पोहोचले आहेत, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा