नागपुरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्व ननोरेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी ओळखीच्याच मित्रांनी त्याचे अपहरण केले होते. गिट्टीखदान पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.
किडनॅपिंग, बेशुद्ध होईना म्हणून मारहाण; 50 लाखांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मित्राची तिघांकडून हत्या, नागपूरमधील घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय अथर्व दिलीप ननोरे यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन आरोपींना अटक केली असून, धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलाचा परिचित असलेलाच मित्र या गुन्ह्याचा सूत्रधार निघाला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयराम गोपाल यादव (१९, रा. गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (२२, रा. गिट्टीखदान) आणि आयुष मोहन शाहू (१९, रा. मानकापूर) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून, अथर्वच्या कुटुंबाशी त्यांची ओळख होती.
खंडणीचा कट
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्वच्या वडिलांचा भाजीपाला व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना होती. याच लोभातून त्यांनी ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. तीन दिवसांपूर्वी या अपहरणाची योजना आखण्यात आली होती. हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यावेळी जयराम यादवने त्याला बोलावून एका टाटा एस वाहनाजवळ नेले, जिथे इतर दोन्ही आरोपी आधीच उपस्थित होते. तिघांनी मिळून अथर्वला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि आवाज करू नये म्हणून त्याचे तोंड बांधले.
बेशुद्ध होत नसल्याने मारहाण
यानंतर आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेले. सुरुवातीला त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच अथर्वचा मृत्यू झाला.
Palghar Crime : नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरिजने नागरिक भयभीत
त्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी कापडाने गळा दाबून हत्या केल्याचेही समोर आले आहे. हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ भरतवाडा परिसरात फेकून दिला आणि वापरलेली गाडी धुवून टाकली.
आरोपींना अटक
दरम्यान, अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात एक संशयास्पद टाटा एस वाहन दिसून आले. या आधारे पोलिसांनी आयुष शाहूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून, सध्या आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा